Marathi Serial : ‘तुमच्या लाडक्या कलाकारांनी स्विकारलं सोशल मीडियावरील चॅलेंज’, पाहा व्हिडीओ

मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच आता पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरू आहे. (‘Your favorite artist accepted the challenge on social media’, watch the video)

Marathi Serial : ‘तुमच्या लाडक्या कलाकारांनी स्विकारलं सोशल मीडियावरील चॅलेंज’, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:54 AM

मुंबई : स्टार प्रवाहवरील मालिकांमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच आता पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरू आहे. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात.(‘Your favorite artist accepted the challenge on social media’, watch the video)

यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनी सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार पटत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमेस्ट्री खरोखर लक्ष वेधून घेणारी आहे.

View this post on Instagram

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g)

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखील सरू, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला. सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

गौरी प्रमाणेच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील दिव्या देखील यात मागे नव्हती. व्हिडीओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला.

या सर्व व्हिडीओंना स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत. इतर माध्यमांवर देखील हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.

संबंधित बातम्या

Aayush Sharma | ‘अंतिम’चे शूट संपवून आयुष शर्मा मालदीवला रवाना, पत्नी आणि मुलांसमवेत धमाल, पाहा फोटो…

Birthday Special | ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’कडे वळायचं होतं पण अभिनयक्षेत्रात आली हरभजनची पत्नी, वाचा गीता बसराबद्दल…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.