Zee Marathi Awards | स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी
'झी मराठी अवॉर्ड्स 2020-21'च्या पूर्वार्धात सर्वोत्कृष्ट भावंडं, आई, वडील, सासू सासरे असे पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर पुढच्या रविवारी सोहळ्याचा उत्तरार्ध रंगणार आहे (Zee Marathi Awards 2020-21 winners list)
मुंबई : ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’मध्ये (Zee Marathi Awards 2020-21) माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला आणि देवमाणूस या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. ब्रह्मे मामांनी सर्वोत्कृष्ट भावंडं आणि सासरे अशा दोन पुरस्कारांवर नावं कोरली. तर देवमाणूस मालिकेतील सरु आजी आणि टोण्या या आजी-नातवंडाच्या जोडीने सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा विभागात पुरस्कार पटकावले. ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’च्या पूर्वार्धाचे रविवारी प्रक्षेपण झाले. (Zee Marathi Awards 2020-21 winners list)
सोहळ्याच्या सुरुवातीलात दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांना माझा होशील ना मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीताचा सन्मान मिळाला. त्यानंतर उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. देवमाणूस मालिकेतील डॉ. अजितकुमार देव या भूमिकेसाठी किरण गायकवाडला खलनायकाचा, तर मालवीकाच्या व्यक्तिरेखेसाठी अदिती सारंगधरला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला.
आई-बाबा, सासू-सूनेचा सन्मान
अभिनेत्री शुभांगी गोखले यांना येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील शकूच्या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार मिळाला, तर स्वीटूचे वडील दादा साळवी यांनी सर्वोत्कृष्ट बाबा या पुरस्कारावर नाव कोरलं. अभिनेत्री निवेदिता सराफ यांना आसावरीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सासूचा पुरस्कार मिळाला, तर त्यांच्याच सूनबाई शुभ्राने सर्वोत्कृष्ट सूनेचा किताब पटकावला.
लाडक्या कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स
पुरस्कार सोहळ्यात स्वीटू-ओम, शकू-नलू, शुभ्रा-आसावरी, सरु आजी यासारख्या व्यक्तिरेखांच्या नृत्याने चार चांद लावले. सई आणि आदित्य यांनी ब्रह्मे मामांसह ‘आप्पांच्या घरात जाऊया’ हे विडंबनात्मक गाणं सादर केलं. तर दिव्या, मंजुळा, गंगा, सुझॅन, मोमो, संजना अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींनी नृत्याची बिजली पाहायला मिळाली. नीलेश साबळे यांनी भगरे गुरुजींची नक्कल करत हशा पिकवला. त्यांना भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांची साथ लाभली.
झी मराठी अवॉर्ड्स 2020-21 पूर्वार्ध – पुरस्कारांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अशोक पत्की (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – शशिकांत बिराजदार (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट भावंडं – ब्रह्मे मामा (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – टोण्या (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट आई – शकू (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट बाबा – दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई) सर्वोत्कृष्ट सासरे – ब्रह्मे मामा (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट खलनायिका – मालवीका (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट खलनायक – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट सून – शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
एकूण पुरस्कार – 13
माझा होशील ना – 04 येऊ कशी तशी मी नांदायला – 04 देवमाणूस – 03 अग्गंबाई सासूबाई – 02
विशेष पुरस्कार
सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स : रेवती बोरकर (काय घडलं त्या रात्री) प्रभावशाली व्यक्तिरेखा : समरप्रताप जहागीरदार (पाहिले ना मी तुला) गोल्डन ब्यूटी : स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)
पाहिले ना मी तुला या मालिकेत समरप्रताप जहागीरदारची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता शशांक केतकर आणि देवमाणूस मालिकेतील डॉ. अजितकुमार देव अर्थात अभिनेता किरण गायकवाड यांनी या सोहळ्याचं खुसखुशीत सूत्रसंचालन केलं. पुढच्या रविवारी ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’चा उत्तरार्ध रंगणार आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, कथाबाह्य कार्यक्रम, सूत्रसंचालक, नायक, नायिका, जोडी, कुटुंब, मालिका यासारखे पुरस्कार प्रदान केले जातील.
View this post on Instagram
संबंधित बातम्या :
सलमान ते सारा, ‘देवमाणूस’ मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज
पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?
(Zee Marathi Awards 2020-21 winners list)