Video : थेट जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा ‘तो’ व्हिडीओ पुढे, अभिनेत्रीला पाहून चाहतेही
जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनीच केली.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. जान्हवी कपूर हिच्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत वरुण धवन (Varun Dhawan) दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना वरुण धवन आणि जान्हवी कपूर दिसले. इतकेच नाही तर वरुण धवन याने जान्हवी कपूर हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा (Big reveal) देखील केला. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा रोमान्स या चित्रपटामध्ये बघायला मिळाला.
जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या मिली चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. विशेष म्हणजे मिली चित्रपटाची निर्मिती ही जान्हवी कपूर हिचे वडील बोनी कपूर यांनी केली. मात्र, मिली हा चित्रपट फ्लाॅप गेला. मिली चित्रपट फ्लाॅप गेल्याने जान्हवी कपूर आणि बोनी कपूर यांना मोठा झटका बसला.
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचे नाव शिखर पहाडिया याच्यासोबत जोडले जातंय. शिखर पहाडिया याला जान्हवी कपूर डेट करत असल्याचे सांगितले जातंय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे अनेक फोटो हे व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वीच हे तिरूपती मंदिरात दर्शनासाठी पोहचले.
VIDEO- #JanhviKapoor dancing her heart out at the Ambani’s Ganpati Visarjan❤️ pic.twitter.com/OPSSP2eSqF
— Janhvi Kapoor Universe (@JanhviKUniverse) September 21, 2023
आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना दिसतंय. अंबानी कुटुंबाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये हा धमाकेदार डान्स करताना जान्हवी कपूर ही दिसली.
आता सोशल मीडियावर जान्हवी कपूर हिचा हा डान्सचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या रिलेशनवर कधीच काही भाष्य केले नाहीये. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.