टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी झाली आई, पण अद्याप अविवाहित, कमावते बक्कळ पैसा

Actress Life : लग्नाआधी आई होण्याचा टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला निर्णय... पण अद्यार अविवाहित... मुलीसोबत जगते आनंदी आणि रॉयल आयु्ष्य, कमावते आफाट पैसा, कोण आहे 'ही' अभिनेत्री, जिच्या खसागी आयुष्याच्या सर्वत्र रंगत आहेत चर्चा?

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी झाली आई, पण अद्याप अविवाहित, कमावते बक्कळ पैसा
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 11:50 AM

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न न करता एकटं राहण्याचा निर्णय घेतला. आजही झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. अशाच एक अभिनेत्री पैकी एक म्हणजे, ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्री साक्षी तन्वर.. साक्षी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण साक्षी हिने कधीही लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. वयाच्या 50 व्या वर्षी देखील साक्षी एकटी आयुष्य जगत आहेत…

साक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने जवळपास 5 वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं आहे. साक्षी गेल्या पाच वर्षांपासून ‘सिंगल मदर’ म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. साक्षी हिचे कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साक्षी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.

साक्षी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत तब्बल 37 पेक्षा अधिक सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 2001 मध्ये प्रसारित झालेल्या ‘करम’ सिनेमाच्या माध्यमातून साक्षी हिने करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘करम’ मालिकेनंतर संसार, कुटुंब, देवी, विरासत आणि काव्यांजली यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

हे सुद्धा वाचा

साक्षी टीव्ही विश्वातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज साक्षी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मीडिया रिपोर्टनुसार, साक्षी मालिकेच्या एक एपिसोडसाठी तब्बल 1.5 लाख रुपये मानधन घेते. साक्षी हिने टीव्ही विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आज साक्षी लेकीसोबत रॉयल आयुष्य जगत आहे.

साक्षी हिच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेमुळे साक्षी तन्वर हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. मालिकेत अभिनेत्रीने अभिनेते राम कपूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मालिकेतील काही सीन सोशल मीडियावर आजही व्हायरल होत असतात. शिवाय लेकीसोबत देखील साक्षी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.