Elvish Yadav | एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यातील वाद पेटला, थेट गंभीर आरोप
एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता आहे. एल्विश यादव हा बिग बाॅसच्या घरात धमाका करताना दिसला. एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो.

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव याने काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये आलिशान घर खरेदी केले. या घराची किंमत कोट्यवधी रूपये आहे. एल्विश यादव हा आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवताना दिसला. एल्विश यादव याने नुकताच एक आलिशान कार (luxury car) देखील खरेदी केली. एल्विश यादव याने खरेदी केलेल्या आलिशान कारची किंमत आज कोट्यवधीच्या घरात आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
एल्विश यादव हा शहनाज गिल हिच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अत्यंत मोठा खुलासा करताना एल्विश यादव हा दिसला. एल्विश यादव याने बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. एल्विश यादव याने थेट म्हटले की, बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांनी माझे अजूनही 25 लाख रूपये दिसले नाहीत. हे ऐकून सर्वजण हैराण झाले.
एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान एकमेकांच्या विरोधात निगेटिव्ह पीआर करण्यात बिझी असल्याचे दिसत आहे. एल्विश यादव हा विजेता झाल्यानंतर अभिषेक मल्हान नाराज झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर अभिषेक मल्हान याने बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांवर काही आरोप देखील केले होते.
आता एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून एल्विश यादव याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. यावर आता थेट बोलताना एल्विश यादव हा दिसलाय. यासर्व गोष्टींच्या मागे कोण आहे याबद्दल मोठा खुलासा करताना एल्विश यादव हा दिसलाय.
एल्विश हा म्हणाला की, माझ्या विरोधात निगेटिव्ह पीआर चालवणे सुरू आहे. एकाप्रकारची मोठी मोहिमच सुरू आहे. या सर्व गोष्टींमागे खास भाई असल्याचे सांगताना देखील एल्विश यादव हा दिसलाय. मात्र, यावेळी थेट अभिषेक मल्हान याचे नाव घेणे एल्विश यादव याने टाळले. मात्र, एल्विश यादव हे कोणाबद्दल बोलत आहे, याची कल्पना सर्वांनाच आल्याचे दिसतंय.