‘फक्त हंगामा करणं माझा हेतू नाही तर..’; विवेक अग्निहोत्रींनी ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ची घेतली शाळा

अग्निहोत्रींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. फिल्मफेअर हा फॅमिली- फेअर असल्याचीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोण डान्स परफॉर्म करणार त्यावर पुरस्काराची खरेदी - विक्री होते, असंही एका युजरने लिहिलंय.

'फक्त हंगामा करणं माझा हेतू नाही तर..'; विवेक अग्निहोत्रींनी 'फिल्मफेअर अवॉर्ड्स'ची घेतली शाळा
Vivek Agnihotri on Filmfare AwardsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 2:23 PM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत असलेला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला सात विभागांमध्ये नामांकन मिळाले आहेत. मात्र तरीही अग्निहोत्रींनी पुरस्कार सोहळ्यास हजर राहण्यास नकार दिला आहे. ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचसोबत त्यांनी फिल्मफेअरवर भ्रष्ट आणि अनैतिक पुरस्कार सोहळा असल्याची टीका केली. ‘मला माध्यमांतून समजलं की ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सात विभागांमध्ये नामांकन मिळालं आहे. प ण मी अत्यंत नम्रपणे या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्याचा भाग होण्यास नकार देतोय’, असं अग्निहोत्रींनी स्पष्ट केलं. यासोबतच त्यांनी पोस्टमध्ये त्यामागचं कारण सविस्तरपणे सांगितलं.

विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट-

‘फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय कोणालाच चेहरा नसतो आणि कोणालाच महत्त्व नसतं. म्हणूनच फिल्मफेअरच्या झगमगाटात आणि अनैतिक विश्वात संजय लीला भन्साळी किंवा सूरज बडजात्या यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांना चेहरा नाही. त्यांच्यासाठी भन्साळी म्हणजे आलिया भट्टसारखे, सूरज बडजात्या म्हणजे मिस्टर बच्चन यांच्यासारके आणि अनीस बाजमी म्हणजे कार्तिक आर्यनसारखे आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड्समुळेच चित्रपट निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना प्रतिष्ठा प्राप्त होते अशातला भाग नाही. पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी फटकारलं.

हे सुद्धा वाचा

‘यात मी एकटा नाही’

‘म्हणूनच बॉलिवूडच्या भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रस्थापितांच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी म्हणून मी असे पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार देतोय. मी कोणत्याही जाचक आणि भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास नकार देतो जे लेखक, दिग्दर्शक आणि इतर विभागाच्या मुख्य कलाकारांना, क्रू मेंबर्सना स्टार्सपेक्षा कनिष्ठ किंवा स्टार्सचे गुलाम समजतात. जे या पुरस्कार सोहळ्यात जिंकतील त्यांचं अभिनंदन आणि जे जिंकण्यात अपयशी ठरतील त्यांचंही अधिक अभिनंदन. या सर्वांत सकारात्मक बाजू म्हणजे मी एकटा नाही. हळूहळू का होईल एक समांतर हिंदी चित्रपटसृष्टी उदयास येत आहे. तोपर्यंत..’ असं लिहित त्यांनी दुष्यंत कुमार यांच्या काही ओळींनी पोस्टचा शेवट केला.

‘सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए,’ अशा या ओळी आहेत. अग्निहोत्रींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. फिल्मफेअर हा फॅमिली- फेअर असल्याचीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोण डान्स परफॉर्म करणार त्यावर पुरस्काराची खरेदी – विक्री होते, असंही एका युजरने लिहिलंय. तर आम्ही तुमच्या निर्णयाच्या पाठिशी आहोत, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.