The Kashmir Files: ऑस्करमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची एण्ट्री; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीत ‘हा’ अभिनेता शॉर्टलिस्ट

ऑस्कर 2023 साठी 'द काश्मीर फाइल्स' शॉर्टलिस्ट, विवेक अग्निहोत्री म्हणाले 'ही तर फक्त सुरुवात'

The Kashmir Files: ऑस्करमध्ये 'द काश्मीर फाइल्स'ची एण्ट्री; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीत 'हा' अभिनेता शॉर्टलिस्ट
The Kashmir FilesImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 1:17 PM

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलं गेलंय. खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी सांगितली. भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाच्या टीमशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचं अग्निहोत्रींनी आभार मानलं. इतकंच नाही तर द काश्मीर फाइल्सचे कलाकार पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांनासुद्धा सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत शॉर्टलिस्ट केलंय.

‘ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप पुढे जायचंय’, अशा शब्दांत अग्निहोत्रींनी आनंद व्यक्त केला. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटावरून मोठा वादसुद्धा निर्माण झाला होता. द काश्मीर फाइल्स हा प्रचारकी चित्रपट असल्याची टीका झाली. या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा दाखवलण्यात आली आहे. चित्रपटावरून वाद झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याने तगडी कमाई केली होती.

अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 252 कोटी रुपये आणि जगभरात 341 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. द काश्मीर फाइल्स हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील दुसरा चित्रपट आहे.

भारताकडून ऑस्कर एण्ट्रीसाठी पाठवलेल्या चित्रपटांमध्ये गंगुबाई काठियावाडी, रॉकेट्री, कांतारा, RRR यांचाही समावेश आहे. या चित्रपटांवर मतदान झाल्यानंतर येत्या 24 जानेवारी रोजी ऑस्करसाठीची अधिकृत नामांकनं जाहीर होणार आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.