The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च नव्हे , विवादांमध्ये सापडलेल्या ‘या’ चित्रपटांनीही केली तगडी कमाई

अनेक विवादानंतरही‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. वादात सापडलेला हा काही पहिलाच चित्रपट नाही यापूर्वीही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते, जे खूप वादात सापडले होते, पण त्यांच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च नव्हे , विवादांमध्ये सापडलेल्या 'या' चित्रपटांनीही केली तगडी कमाई
विवादानंतरही या चित्रपटांनी केली तगडी कमाईImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:34 AM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटासंदर्भात सुरू असलेला वाद (controversy) थांबण्याचे नाव घेत नाही. आता पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या चित्रपटाची कथा बनावट असल्याचे म्हटले असून राज्यात प्रदर्शनावर बंदी घातली आहे. राज्यात कोणतीही हिंसेची घटना होऊ नये आणि शांतता राखण्यासाठी हे पाऊच उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे देशात या चित्रपटावर बंदी आणणारं पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य ठरलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की काही राज्यांना एका षड्यंत्राखाली बदनाम केले जात आहे. आधी काश्मीर, आता केरळ आणि नंतर बंगालही त्यांचे लक्ष्य असू शकते.

तमिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटाबद्दल सुरू असलेला राजकीय वाद आपल्या जागी असला तरी, दरम्यानच्या काळात ‘द केरळ स्टोरी’च्या आतापर्यंतच्या कलेक्शनने या चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि निर्माता-दिग्दर्शकांचा उत्साह वाढवला आहे. दक्षिणेत, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये, चित्रपटाला कमी स्क्रीनिंग मिळाले आहे, तरीही अनेक शहरांमध्ये चित्रपटाला चांगली ओपनिंग आणि वीकेंड मिळाला आहे.

‘द केरळ स्टोरी’ ची आत्तापर्यंतची कमाई

आत्तापर्यंतच्या कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाला वादाचा फायदा होताना दिसत आहे. वीकेंडला बऱ्याच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशीची कमाई दुप्पट झाली आहे. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांत या चित्रपटाने 37 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या दिवशी 8.03 कोटी, दुसऱ्या दिवशी 12.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16.5 कोटींची कमाई केली.

‘द केरळ स्टोरी’चे अंदाजे बजेट 40 कोटी इतके आहे. हे काही फार मोठे बजेट नाही. त्या दृष्टीने चित्रपट आपली किंमत वसूल करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. चित्रपटाला वादाचा बूस्टर डोस असाच मिळत राहिला तर हा चित्रपट हिटच्या श्रेणीत येईल आणि कमी बजेटच्या श्रेणीत विक्रमी कलेक्शन करणारा चित्रपट म्हणून गणला जाईल. यापूर्वीही अनेक चित्रपट वादात सापडले होते पण त्यांच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

वादामुळे ‘पठाण’ लाही झाला फायदा

एखाद्या चित्रपटाला वादाचा फायदा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट. पठाणच्या गाण्याचे बोल आणि दीपिका पदुकोणच्या ड्रेसवरून बराच गदारोळ झाला होता. शाहरुख खानच्या विरोधात बहिष्कार मोहीमही सुरू करण्यात आली होती. सेन्सॉरनेही कात्री चालवली, पण चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. ‘पठाण’ने रिलीजच्या पाच दिवसांत 280 कोटींची कमाई केली आहे, तर आतापर्यंत त्याच्या एकूण कलेक्शनचा आकडा 544 कोटींहून अधिक आहे.

वादामुळे ‘ द काश्मीर फाइल्स’ नेही सेट केला रेकॉर्ड

‘द केरळ स्टोरी’ची तुलना ‘द काश्मीर फाइल्स’शीही केली जात होती. तथापि, दोन्हीच्या आकडेवारीत अजूनही बराच फरक आहे. वादांमुळे विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी सिनेमागृहांमध्ये गर्दी केली होती. यामुळेच चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 50 कोटींचा आकडा पार केला, तर एकूण कमाईचा विचार केला तर हा आकडा 300 कोटींहून अधिक आहे.

‘पद्मावत’ चीही होती बंपर कमाई

अभिनेत्री दीपिका पडुकोणच्या चित्रपटांचा वादांशी घनिष्ठ संबंध आहे. दीपिकाचे बहुतेक चित्रपट वादात सापडले पण त्यांनी जबरदस्त कमाईसुद्धा केली होती. णवीर सिंगसोबतच्या ‘रासलीला’चे बजेट 88 कोटीं रुपये होते, मात्र त्या चित्रपटाने 220 कोटींची कमाई केली होती, तर ‘पद्मावत’वरील महाभारतानंतरही या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. ‘पद्मावत’मधील खिलजीच्या स्वप्नातील दृश्य आणि ‘घूमर’ या गाण्यावरून बराच काळ वाद सुरू होता. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने 585 कोटींचा विक्रम केला.

‘पीके, OMG और ‘दंगल’ या चित्रपटांनाही झाला वादाचा लाभ

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’ आणि परेश रावल स्टारर OMG या चित्रपटांनाही हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवल्याबद्दल वादांचा फायदा झाला. ‘पीके’ची कमाई अंदाजे 340 कोटी होती, तर 60 कोटींमध्ये बनवलेल्या ओएमजीने 193 कोटींची कमाई केली होती.

2016 मध्ये आलेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटावरून वाद झाला होता. चित्रपटाला विरोध झाला. खरंतर त्यावेळी आमिर खानची माजी पत्नी किरण राव यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दंगल चित्रपटावर बहिष्कार सुरू झाला पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर काहीही (विपरीत) परिणाम झाला नाही. वादानंतरही या चित्रपटाने 387 कोटींची कमाई केली होती.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.