Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यन का झाला आऊट? जाणून घ्या यामागचे कारण…

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनची 'दोस्ताना 2'मधून (kartik aaryan dostana 2) हकालपट्टी केली आहे. या चित्रपटातून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पुन्हा एकदा नेपोटीझमचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यन का झाला आऊट? जाणून घ्या यामागचे कारण...
कार्तिक आर्यन
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:37 AM

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनची ‘दोस्ताना 2’मधून (kartik aaryan dostana 2) हकालपट्टी केली आहे. या चित्रपटातून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पुन्हा एकदा नेपोटीझमचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. परंतु, खरोखरच यामागचे नेपोटीझम कारण आहे का? असे काय कारण होते ज्यामुळे कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील मतभेद इतके वाढले की अभिनेत्याला या बिग बजेटच्या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला (The main reason behind why karan Johar removed kartik aaryan from dostana 2).

दुसरीकडे अभिनेता कार्तिक आर्यन हाच या गोष्टीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत पत्रकार उज्ज्वल त्रिवेदी यांनी बॉलिवूडचे पत्रकार संजय मिश्रा यांच्याशी फेसबुकद्वारे बातचीत दिली. या दरम्यान संजय मिश्रा यांनी स्टेप-बाय-स्टेप या घटनेची माहिती दिली.

‘दोस्तना 2’च नाही तर कार्तिकला मिळाले असते आणखी चित्रपट

संजय मिश्रा यांनी सांगितले की, त्याच्या पीआर प्रसिद्धीसाठी सारा अली खान हिच्याशी त्याचे नाव जोडण्यात आले. ते म्हणातात की, जर प्रेक्षकांना तुम्ही आवडत असाल आणि तुम्ही चांगले काम करत असाल तर लोक तुम्हाला आणखी काम करण्याची संधी देतील. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ नंतर कार्तिक आर्यनलाही यश मिळालं आणि प्रत्येकाला या यशाचे भांडवल करायचे होते.

करण जोहरने कार्तिक आर्यनवर विश्वास ठेवला आणि त्याला ‘दोस्ताना 2’ देण्यात आला. धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनवर जनसंपर्क वाढवण्यासाठी खूप खर्च केला. धर्मा प्रोडक्शन्ससह, कार्तिक केवळ ‘दोस्ताना 2’ नव्हे तर काही इतर चित्रपटांमध्येही काम करत होता. इतकेच नाही तर, धर्मा कार्तिक आर्यनच्या पीआर उपक्रमांची जबाबदारी देखील घेत होती आणि कार्तिककडे स्वतःची एक वैयक्तिक पीआर टीमदेखील आहे.

कार्तिकच्या पीआर टीमने आणले वितुष्ट

संजय म्हणाले की, कार्तिकच्या पीआर टीममुळेच त्यांची चर्चा धर्मा प्रॉडक्शनशी झाली. कार्तिक संजय लीला भन्साळीचा चित्रपट करत असल्याची बातमी त्याच्या पीआर टीमने सर्वत्र पसरवली. मात्र, हे सगळे निव्वळ प्रसिद्धीसाठी सुरु होते. धर्मा प्रॉडक्शनसाठी ही बातमी फारच त्रासदायक होती. मात्र, अशा बातम्या सुरू असल्याचे भन्साळी यांना समजताच त्यांनी कार्तिकबरोबर कोणताही चित्रपट साईन केलेला नाही, याची पुष्टी केली (The main reason behind why karan Johar removed kartik aaryan from dostana 2).

करण जोहरसाठी ही त्रासदायक बातमी होती. कारण कार्तिकच्या पीआर टीमने धर्मा प्रॉडक्शनला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की, कार्तिक फक्त तुमचा नाही आणि तो फक्त तुमच्याबरोबर काम करत नाही. दरम्यान, आणखीन किरकोळ बातम्याही समोर आल्या ज्याकडे दुर्लक्ष केले गेले.

करणचा सन्मान दुखावला

हे सर्व सुरु असतानाच आणखी एक बातमी आली की, नेटफ्लिक्सने कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट 135 कोटींमध्ये विकत घेतला आहे. हे करून, कार्तिकच्या पीआर टीमने पुन्हा एकदा करणला कार्तिक आर्यनचा चित्रपट नेटफ्लिक्सवर इतक्या मोठ्या प्रमाणात विकला जात आहे, असे भासवून दिले. आता यामुळे करण जोहरचा सन्मानही दुखावला गेला होता.

‘दोस्ताना 2’चे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण लंडनमध्ये झाल्याने, करण जोहरने कार्तिक आर्यनला काढून टाकल्याने मोठे नुकसान झाले आहे. बाकीचे शूटिंग मुंबईत करायचे होते. आता जेव्हा कार्तिकच्या पीआर टीमला याविषयी विचारणा केली गेली, तेव्हा पुन्हा एकदा त्यांचा आडमुठेपणा सुरू झाला. कार्तिकच्या पीआर टीमने तारखा दिल्या नाहीत. त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत ही कार्तिकची पीआर टीमच ठरली आहे.

पाहा व्हिडीओ

(The main reason behind why karan Johar removed kartik aaryan from dostana 2)

हेही वाचा :

PHOTO | KGF मधील ‘रॉकी’च्या दमदार हिंदी संवादामागे लपलाय ‘या’ मराठमोळ्या कलाकाराचा आवाज!

Shahid Kapoor | ‘राजपूत राजा’नंतर शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.