Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’बद्दल अत्यंत महत्वाचे अपडेट, चाहत्यांमध्ये उत्साह सलमान खान याने नुकताच
बिग बॉस 17 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. सलमान खान हा बिग बॉस 17 ला होस्ट करताना दिसेल. बिग बॉस 17 मध्ये सीमा हैदर ही सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. बिग बॉस 17 धमाल करेल असेही सांगितले जात आहे.
मुंबई : बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) ची चाहते हे आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच बिग बाॅस ओटीटीचा फिनाले पार पडलाय. एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरलाय. बिग बाॅस ओटीटी (Bigg Boss Ott) संपल्यानंतर चाहते हे बिग बॉस 17 ची वाट बघत आहेत. विशेष म्हणजे बिग बॉस 17 टीआरपीमध्ये टाॅप करण्यासाठी निर्मात्यांनी देखील कंबर कसली आहे. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकांसोबत निर्माते संपर्क करत आहेत. बिग बॉस 16 टाॅप राहिल्यामुळे या सीजनकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.
बिग बॉस 17 मध्ये सलमान खान हाच होस्ट करताना दिसले. नुकताच आता बिग बॉस 17 बद्दल एक अत्यंत मोठे अपडेट हे पुढे येतंय. रिपोर्टनुसार सलमान खान याने नुकताच बिग बॉस 17 चा प्रोमो शूट केला आहे. रिपोर्टनुसार सलमान खान याने मंगळवारी मुंबईमध्ये हा प्रोमो शूट केलाय. यावेळी सलमान खान हा अत्यंत खास लूकमध्ये दिसत होता.
सलमान खान याने भगव्या रंगाची कुर्ती घातल्याचे देखील सांगितले जात आहे. बिग बॉस 17 मध्ये नेमके कोण सहभागी होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 मध्ये पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालेली सीमा हैदर ही सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा होती. इतकेच नाही तर सीमा हैदर हिने ही याबद्दल भाष्य केले.
सीमा हैदर हिने मुलाखतीमध्ये सांगितले की, मला बिग बॉस 17 ची आॅफर आलीये. मात्र, मी बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार की नाही हे मी लवकरच सांगेल. बिग बॉस 17 मध्ये शैलेश लोढा म्हणजे आपले सर्वांचे आवडते तारक मेहता हे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तारक मेहता मालिकेमध्ये शैलेश लोढा यांनी अनेक वर्षे तारक मेहताचे पात्र साकारले आहे.
तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद बघायला मिळाला. इतकेच नाही तर असित कुमार मोदी विरोधात शैलेश लोढा यांनी थेट कोर्टात धाव घेतली. अनेक आरोप प्रत्यारोपाचे सत्र यावेळी रंगताना दिसले. यामुळेच आता शैलेश लोढा हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाल्यानंतर मोठे खुलासे होऊ शकतात.
बिग बॉस 17 मध्ये फक्त शैलेश लोढा हेच नाही तर तारक मेहता मालिकेतील अजून काही मोठे चेहरे हे सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे असित कुमार मोदी यांनी मोठा झटका हा नक्कीच बसू शकतो. यासोबतच बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.