Video | सोनू सूद याचा पंक्चरच्या दुकानातील व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्याने केले थेट ‘हे’ काम
सोनू सूद हा कायमच चर्चेत राहणारा बाॅलिवूड अभिनेता आहे. सोनू सूद याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोनू सूद हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

मुंबई : सोनू सूद याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. सोनू सूद (Sonu Sood) याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. विशेष म्हणजे सोनू सूद हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसतोय. सोनू सूद याचे नाव कोरोनामध्ये चर्चेत आले. कोरोनाच्या वाईट काळात सोनू सूद हा लोकांच्या मदतीला धावून आला. मागेल त्याला मदत करताना सोनू सूद हा दिसला.
सोनू सूद याने प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न कोरोना काळात केला. इतकेच नाही तर कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांना आॅनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली. यावेळी ज्या मुलांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी फोन नव्हते. अशा मुलांना फोनचे वाटप करताना देखील सोनू सूद हा दिसला. सोनू सूद याला लोक मसिहा या नावाने देखील ओळखतात.
सोनू सूद याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सोनू सूद याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो हैद्राबाद येथे असल्याचे दिसतंय. सोनू सूद हा एका पंक्चरच्या दुकानात दिसतोय. यावेळी चक्क पंक्चर काढताना सोनू सूद हा दिसतोय. यावेळी सोनू सूद हा त्या दुकानात असलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारताना दिसतोय.
View this post on Instagram
इतकेच नाही तर तो दिवसाला किती कमाई करतो हे विचारताना देखील सोनू सूद हा दिसत आहे. आता सोनू सूद याने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. सोनू सूद याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना सोनू सूद याचा हा व्हिडीओ चांगलाच आवडल्याचे दिसतंय.
काही दिवसांपूर्वीच सोनू सूद याच्या नावाने एक थाळी लॉन्च करण्यात आली. ती मंडी थाळी असून यामध्ये एकूण 20 लोक एकत्र बसून जेवू शकतात. ही अत्यंत मोठी थाळी आहे. या थाळीला सोनू सूद याचे नाव देण्यात आले. इतकेच नाही तर या थाळीला सोनू सूद याने भेट दिली. सोनू सूद हा नेहमीच सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करताना दिसतो.