Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूनम पांडे हिच्या खोट्या मृत्यूची तयारी महिन्यांपासून सुरू, हैराण करणारे खुलासे, अभिनेत्रीसह..

पूनम पांडे हिचे निधन झाल्याची एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. हेच नाही तर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला भावपूर्ण श्रध्दाजंली वाहिली. यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आणि लोक हैराण झाले.

पूनम पांडे हिच्या खोट्या मृत्यूची तयारी महिन्यांपासून सुरू, हैराण करणारे खुलासे, अभिनेत्रीसह..
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 1:01 PM

मुंबई : माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ही पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. फक्त हेच नाही तर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडेच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. धक्कादायक आणि हैराण करणारे म्हणजे थेट पूनम पांडे हिच्याच सोशल मीडियावरून तिचे निधन झाल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले. मात्र, पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल सुरूवातीपासूनच मोठा संभ्रम हा बघायला मिळाला. विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

पूनम पांडे हिने निधनाच्या पोस्टनंतर तब्बल 24 तासांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत थेट आपण जिवंत असल्याचे म्हटले. यानंतर लोकांनी जोरदार समाचार घेत चक्क पूनम पांडे हिची लाजच काढली. फक्त लाजच नाही तर अनेकांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

नुकताच एक अत्यंत हैराण करणारा खुलासा झालाय. चक्क गेल्या कित्येक महिन्यांपासून तरी पूनम पांडे ही तिच्या खोट्या मृत्यूची तयारी करत होती. यावर गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. कशाप्रकारे पोस्ट शेअर करायची आणि लोकांमध्ये संभ्रम अंत्यसंस्काराबाबत करायचा हे सर्वकाही अगोदरच ठरले होते.

पूनम पांडे हिने अगोदरच व्हिडीओमध्ये सांगितले की, गर्भाशयातील कॅन्सरबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण हे केले. हेच नाही तर लोक शिव्या घालणार याचीही कल्पना होती. म्हणजेच पूनम पांडे हिच्या खोट्या निधनाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू होती.

पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. पूनम पांडे ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय दिसते. नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना पूनम पांडे ही दिसते. पूनम पांडे हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळेही टीका ही केली जाते. पूनम पांडे मोठ्या वादात कायमच अडताना देखील दिसते.

मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे...
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे....
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले....
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.