Video | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूरचा गुपचूप साखरपुडा? ‘तो’ व्हिडीओ अखेर व्हायरल, हातामध्ये

बोनी कपूर याची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच एक खास व्हिडीओ व्हायरल झालाय.

Video | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूरचा गुपचूप साखरपुडा? 'तो' व्हिडीओ अखेर व्हायरल, हातामध्ये
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 3:57 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचे चित्रपट (Movie) काही खास धमाका करताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप (flap) गेला. विशेष म्हणजे मिली हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर जान्हवी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. जान्हवी कपूर हिला मिलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

फक्त जान्हवी कपूर हिचाच नाही तर त्यादरम्यान कतरिना कैफ हिचा फोन भूत आणि सोनाक्षी सिन्हा हिचा डबल एक्सएल हे देखील चित्रपट फ्लाॅप गेले. मिली चित्रपटानंतर जान्हवी कपूर ही एका साऊथच्या मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे ते खरे ठरले आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हैद्राबाद येथे करत आहे.

जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत तिरुपती मंदिरात गेली. यावेळी जान्हवी कपूर हिने साऊथ इंडियन स्टाईल लहंगा चोळी घातली होती तर शिखर पहाडिया याने लुंगी घातली. याचाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.

सध्या एक चर्चा तुफान रंगताना दिसत आहे. ती म्हणजे जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी गुपचूप प्रकारे साखरपुडा केला. कारण तिरुपती मंदिरातून बाहेर पडत असताना जान्हवी कपूर हिच्या हातामध्ये एक डायमंड रिंग दिसत आहे. या रिंगवरूनच ही चर्चा तूफान रंगत आहे की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी साखरपुडा केला आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये. नेहमीच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे पार्ट्यांमध्ये एकसोबत सहभागी होताना दिसतात. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर बघायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जाते.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहाडिया हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. तो एक व्यावसायिक देखील आहे. आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी साखरपुडा केल्याची तूफान चर्चा रंगली आहे. आता यावर हे काय भाष्य करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.