AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातात पतीचं निधन, अभिनेत्रीकडून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, आता कसं जगतेय आयुष्य?

Actress Life | वयाच्या 23 व्या वर्षी पतीचं विमान अपघातात निधन, अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, आज अभिनेत्री जगतेय असं आयुष्य... अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत केलं चाहत्यांचं मनोरंजन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

विमान अपघातात पतीचं निधन, अभिनेत्रीकडून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, आता कसं जगतेय आयुष्य?
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 3:04 PM

बॉकबस्टर ‘चक दे इंडिया’ सिनेमा महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री विद्या माळवदे तुम्हाला आठवत असेल. अभिनेत्रीने सिनेमात गोलकीपरची भूमिका बजावली होती. अभिनेत्री अधिक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली नाही. पण ‘चक दे इंडिया’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच दुःखाचं डोंगर कोसळलं. पतीच्या निधनानंतर विद्या हिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने आयुष्यात आलेल्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

2002 मध्ये झाली विद्या हिच्या पतीचं निधन

विद्या आता सोशल मीडियावर आनंदी दिसत असली तरी, एक वेळ अशी होती जेव्हा विद्याने स्वतःला संपवण्याचा देखील निर्णय घेतला होता. विद्या हिचं लग्न 2002 मध्ये अरविंद सिंह बग्गा याच्यासोबत झालं होतं. अरविंद हे पायलट होते आणि अभिनेत्रीच्या पतीचं विमान अपघातात झालं. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे कोलमडली होती. अभिनेत्रीची प्रकृती देखील खालवली होती.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीने पहिल्या पतीच्या निधनानंतर 9 वर्षांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने दुसरं लग्न संजय डायमा यांच्यासोबत केलं. पण विद्याने दिग्दर्शकाला लग्नासाठी होकार द्यायला दोन वर्षांचा काळ घेतला. आता अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदी आहे. विद्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

हे सुद्धा वाचा

विद्या म्हणाली होती, ‘पतीच्या निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये होती. मी विचार केला पती माझ्याकडे नाही येऊ शकत पण मी त्यांच्याकडे जाऊ शकते. मी मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या. मी गोळ्या खाणारचं होती, तेवढ्यात माझ्या वडिलांनी पाहिलं. तेव्हा ठरवलं माझ्यामुळे आई-वडिलांना कोणता त्रास होणार नाही… याची काळजी घेईल…’ असं देखील अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली होती.

अभिनेत्री विद्या माळवदे हिचे सिनेमे

सध्या अभिनेत्री विद्या माळवदे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने बेनाम, किडनॅप, तुम मिलो तो सही, आपके लिए हम , नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावली आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.