‘हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील’, पायल घोषची पीएम मोदींना हाक

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणाऱ्या अभिनेत्री पायल घोष हिने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

'हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील', पायल घोषची पीएम मोदींना हाक
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 8:06 AM

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात (Anurag Kashyap) लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री पायल घोष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यासोबतच तिची अभिनेत्री ऋचा चड्ढासोबत सोशल मीडियावर सुरु असलेली कॅट फाईट खूप व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत पायलने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.  (These mafia gang will kill me and will prove my death as suicide, Payal Ghosh appeals to PM Modi for help)

पायलने एका ट्विटद्वारे पीएम मोदींकडे मदत मागितली आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, “ही माफिया गँग माझी हत्या करेल आणि वरुन ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सिद्ध करतील”. पायलने या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांना टॅग केलं आहे.

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात ऋचा चड्ढा हिचं नावही घेतलं आहे. त्यामुळे ऋचाने पायलविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर पायलचे वकील नितीन सातपुते म्हणाले की, “याप्रकरणी पायल ऋचा चड्ढाची माफी मागणार आहे”.

पायलने एका मुलाखतीदरम्यान ऋचा चड्ढाचे नाव घेतले होते. पायल म्हणाली होती की, “अनुराग कश्यप यांनी मला सांगितलं की ऋचासह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाल्या आहेत”. दरम्यान मंगळवारी पायल घोषने दिल्ली स्थित राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेऊन अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. याशिवाय तिने पोलिस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती.

अनुराग कश्यपची तब्बल 8 तास चौकशी

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अनुराग कश्यपची वर्सोवा पोलिस स्थानकात तब्बल आठ तास चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या बलात्कार आणि इतर सर्व आरोपांचे खंडन केले. पायल घोषला (Payal Ghosh) मी फक्त प्रोफेशनली ओळखतो. त्याशिवाय, गेल्या अनेक काळापासून माझे पायलशी बोलणेही झाले नसल्याचे, अनुरागने पोलिसांना सांगितले.

संबंधित बातम्या

Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

(These mafia gang will kill me and will prove my death as suicide, Payal Ghosh appeals to PM Modi for help)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.