प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अभिनेत्याने केला video पोस्ट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. या घटनेनंतर या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या चाहत्यांना या घटनेने धक्का बसला आहे.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अभिनेत्याने केला video पोस्ट
anupam kherImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 8:44 PM

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीच्या वीरा देसाई रोड परिसरात अनुपम खेर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील महत्वाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून ही चोरी केल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. अनुपम खेर यांनी स्वत: या प्रकरणी त्यांच्या कार्यालयाच्या झालेल्या अवस्थेचा व्हिडीओ जारी केला आहे.

बॉलीवूडचे बडे अभिनेते अनुपम खेर यांच्या बाबत धक्कादायक बातमी आली आहे. त्यांच्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील आलिशान कार्यालयात चोरट्यांनी बिनधास्त शिरकाव करीत मुद्देमाल चोरी केला आहे. या घटनेनंतर चोरट्यांनी त्यांच्या ऑफीसच्या दरवाज्याची केलेल्या अवस्थेचा व्हिडीओ देखील अभिनेत अनुपम खेर यांनी जारी केला आहे. 19 जून रोजी ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या अंधेरीतील कार्यालयात दोघा चोरांनी शिरकाव करीत तेथील चित्रपटांचा निगेटिव्ह चोरी केल्या आहेत. या प्रकरणात अभिनेते अनुपम खेर यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनुपम खेर यांनी केलेली पोस्ट येथे पाहा –

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यांनी या चोरीच्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या चोरट्यांनी केलेल्या दुरावस्थेचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. या संदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीलेय की काल रात्री दोन चोरांनी माझ्या वीरा देसाई येथील कार्यालयाचा दरवाजा तोडून त्यात प्रवेश केला. अकाऊंट डिपार्टमेंट्सची संपूर्ण तिजोरी आणि आमच्या कंपनीच्या द्वारे निर्मिती केलेल्या चित्रपटाच्या निगेटिव्ह एका बॉक्समध्ये होत्या. या गोष्टी ते उचलून घेऊन गेले आहेत. आमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. त्यांनी पुढे सांगितले की पोलिसांनी आश्वस्थ करीत या प्रकरणाचा लवकर छडा लावून चोरट्यांना पकडून आणू असे म्हटले आहे. कारण सीसीटीव्हीत दोघे चोर सामानासह ऑटोत बसताना दिसत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हा व्हिडीओ माझ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस येण्यापूर्वी चित्रीत केला आहे.

चाहत्यांना धक्का

अनुपखेर यांची पोस्ट पाहून त्यांचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. एका फॅनने लिहीलेय की देव चोरांना नीट सद्बुद्धी देवो. तर अनेक जण विचारत आहेत की ऑफीसमधून रोकड पण चोरली आहे का ? अनेक चाहत्यांनी अनुपम खेर यांना काळजी करु नका चोरांना पोलिस लवकरच बेड्या घालतील असे आश्वस्थ केले आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरीने त्यांच्या चाहत्यांनी धक्का बसला आहे. चोर लवकर पकडले जावेत अशीच प्रार्थना चाहते करीत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.