Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

'आणि काय हवं'मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. (Third season of 'Ani Kay Hava' announced, Trailer will be out on 28 july)

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 5:05 PM

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या जोडीनं रिलपासून ते रिअल लाईफपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रचंड प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वांची आवडती ऑफस्क्रीन जोडी प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘आणि काय हवं‘ (Ani Kay Hava) मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि अ मिर्ची ओरिजनल्स क्रिएशनवर ‘आणि काय हवं’चा तिसरा सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

प्रिया बापटनं शेअर केला खास प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

पाहा उमेशनं शेअर केलेला हा प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

‘आणि काय हवं’चा पहिला सिझन आला आणि बघता बघता या सिझननं प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलं. जुई आणि साकेत प्रत्येकालाच आपल्या घरातीलच एक वाटू लागले. या दोघांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांना आपलेसं केलं. आता परत ते आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचे रुसवे फुगवे, त्यांच्या आयुष्यातील गंमतीजंमती, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

तर वरूण नार्वेकर दिग्दर्शित या गोड आणि गुणी जोडप्याची गोष्ट असलेल्या ‘आणि काय हवं’ सिझन 3 चा ट्रेलर 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रियाकडून प्रेक्षकांसाठी आणखी भेट

नुकतंच अभिनेत्री प्रिया बापटनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केली होती. ज्यात ती म्हणाली, ‘एक मोठी घोषणा होणार आहे. अशी घोषणा तर फक्त स्वप्नातच होते… ही घोषणा काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रतिक्षा करा..’ आता हे कोणती घोषणा आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

संबंधित बातम्या

सिद्धार्थच्या ‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’

Surbhi Chandna : टेलिव्हिजनची बोल्ड ‘नागिन’ सुरभी चंदनाचं ग्लॅमरस रुप, पाहा फोटो

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.