AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉपलेस फोटोशूट, ड्रग डीलरशी लग्न; ‘बिग बॉस 17’मध्ये दिसणार ही वादग्रस्त अभिनेत्री?

'बिग बॉस'मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील हे प्रीमियरच्या दिवशीच समोर येईल. मात्र सध्या स्पर्धकांच्या यादीत इशा मालवीय, शफक नाज, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन, हर्ष बेनीवाल, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, वृषभ जयस्वाल, सीमा हैदर आणि सचिन यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

टॉपलेस फोटोशूट, ड्रग डीलरशी लग्न; 'बिग बॉस 17'मध्ये दिसणार ही वादग्रस्त अभिनेत्री?
अंडरवर्ल्डशी कनेक्शनमुळे चर्चेत, ओळखलंत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 10:03 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा सतरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून या नवीन सिझनची सुरुवात होणार असून त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. गेल्या काही सिझनप्रमाणेच यंदाच्या सिझनचंही सूत्रसंचालन सलमान खानच करणार आहे. बिग बॉसच्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याविषयीची एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये 90 च्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचंही नाव आहे. ही अभिनेत्री ‘बिग बॉस’मधील सर्वात काँट्रोव्हर्शियल स्पर्धक ठरणार यात काही शंका नाही. कारण टॉपलेस फोटोशूट असो किंवा सतत चर्चेत असलेलं तिचं खासगी आयुष्य असो, ही अभिनेत्री नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या अभिनेत्रीने 2003 मध्ये चित्रपटसृष्टी सोडली आणि त्यानंतर ती योगिनी बनली.

टॉपलेस फोटोशूटमध्ये धुमाकूळ

‘बिग बॉस’च्या सतरावा सिझनमध्ये सहभागी होणारी ही सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ममता कुलकर्णी आहे. ‘तिरंगा’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने ‘चायना गेट’, ‘वक्त हमारा है’ आणि ‘क्रांतीवीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 1993 मध्ये ममता कुलकर्णीने ‘स्टारडस्ट’ या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. या फोटोने त्यावेळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या बोल्ड फोटोशूटमुळे त्यावेळी ममताला पंधरा हजार रुपये दंड भरावा लागला होता. इतकंच नव्हे तर तिच्या विरोधात प्रदर्शनंसुद्धा झाली होती आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

अंडरवर्ल्डशी कनेक्शन

ममता कुलकर्णी तिचं अंडरवर्ल्डची असलेल्या कनेक्शनमुळे सतत चर्चेत राहिली. राजकुमार संतोषी यांच्या ‘चायना गेट’ या चित्रपटातून तिला बाहेर काढलं होतं. मात्र अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी असलेल्या कनेक्शनमुळेच ममताची पुन्हा एकदा चित्रपटात एण्ट्री झाली असं म्हटलं जातं. त्यानंतर ममता आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन हे जणू समीकरणच बनलं होतं. 2000 मध्ये तिने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. 2016 दरम्यान तिचं नाव एका ड्रग रॅकेटशी जोडलं गेलं होतं. त्यावेळी केन्या एअरपोर्टवर विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यासोबत दोन हजार कोटी रुपयांच्या ट्रक रॅकेटचा खुलासासुद्धा पोलिसांनी केला होता. मात्र ममताने तिच्या विरोधात असलेले सर्व आरोप फेटाळले होते. ममता सध्या केन्यामध्ये असून तिथे ती योगिनी बनली आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या सतराव्या सिझन मध्ये सहभागी होण्यासाठी ती लवकरच भारतात परत येणार असल्याचं कळतंय.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.