Bigg Boss 16 Winner: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सुनेला मिळाली सर्वाधिक मतं; बनणार बिग बॉस 16 ची विजेती?
श्रीजिता डे आणि साजिद खानसोबतच प्रेक्षकांचा लाडका अब्दु रोझिकसुद्धा या शोमधून बाहेर पडला आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात विजेतेपदासाठी तगडी चुरस रंगली आहे.
मुंबई: ‘बिग बॉस 16’मध्ये ‘वीकेंड का वार’ या खास एपिसोडच्या आधीच घरातील एक-दोन नाही तर तीन स्पर्धकांचं एलिमेशन पार पडलं आहे. श्रीजिता डे आणि साजिद खानसोबतच प्रेक्षकांचा लाडका अब्दु रोझिकसुद्धा या शोमधून बाहेर पडला आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात विजेतेपदासाठी तगडी चुरस रंगली आहे. तीन स्पर्धक आधीच ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यात रॅपर एमसी स्टॅन, अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी यांचा समावेश आहे.
प्रियांका-शिव ठाकरेमध्ये टक्कर
अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी ही पहिल्यापासूनच या शर्यतीत सर्वांच्या पुढे आहे. मात्र तिच्यासमोर शिव ठाकरेचं मोठं आव्हान आहे. आता प्रियांकाने शिवलाही जोरदार टक्कर दिली आहे. बिगेस्ट बॉस कॉन्टेस्टमध्ये प्रियांकाने शिव ठाकरेला मात दिली आहे आणि ती विजेती ठरली आहे. अंकित गुप्ताच्या एलिमिनेशननंतर प्रियांका आणखी तगडी स्पर्धक म्हणून समोर येत आहे.
बिग बॉसच्या घरातील एक ग्रुप आता कमकुवत झाला आहे. कारण त्याचा मास्टरमाईंड साजिद खान आता बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवणारा अब्दु रोझिकसुद्धा शोमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्या ग्रुपमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुम्बुल तौकिर खान आणि निमृत आहलुवालिया हे स्पर्धक राहिले आहेत. निमृतने शिव ठाकरेला बिग बॉसच्याही ट्रॉफीपेक्षा वर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ती स्वत: विजेती होण्याचं स्वप्न बघत नाहीये. एमसी स्टॅनचा खेळ हा पहिल्यापासूनच गुंतागुंतीचा राहिला आहे. तो फक्त त्याच्या चाहत्यांच्या जोरावर इथपर्यंत टिकू शकला आहे.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात आता खरी चुरस रंगली आहे प्रियांका आणि शिव यांच्यामध्ये. शालीन भनोट आणि टिना दत्ता हे स्वत:चेच मुद्दे सोडवू शकत नाहीयेत. दुसरीकडे अर्चना गौतम आता शोमध्ये फक्त एंटरटेन्मेंटसाठी राहिली आहे. सौंदर्या खूप आधीच तिच्या ध्येयापासून दूर गेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रियांका चहर चौधरीलाच विजेती मानलं जातंय.
बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले पार पडण्यासाठी अजून एक महिना शिल्लक आहे. या एक महिन्यात नेमकं काय घडतंय, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.