Neena Gupta | कशी झाली नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट; असं सुरू झालं अफेअर

अभिनेत्री नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं अनेकांनाच माहित आहे. विवाहित विवियन हे नीनाच्या प्रेमात पडले होते. या दोघांनी कधी लग्न केलं नाही, मात्र त्यांना मसाबा ही मुलगी आहे. या दोघांची पहिल्यांदा भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले, ते जाणून घेऊयात..

Neena Gupta | कशी झाली नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट; असं सुरू झालं अफेअर
Neena Gupta, Vivian Richards, Masaba GuptaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:21 PM

मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने नुकतीच लग्नगाठ बांधली. या लग्नाला मसाबाचे वडील आणि माजी वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांनीही हजेरी लावली होती. बऱ्याच मुलीखतींमध्ये नीना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. मात्र या दोघांची पहिली भेट कशी झाली आणि त्यांचं अफेअर कसं सुरू झालं, त्याबद्दल जाणून घेऊयात..

विवियन रिचर्ड्स ज्यावेळी वेस्ट इंडिज टीमचं प्रतिनिधित्व करत होते, तेव्हा त्यांची टीम फार मजबूत होती आणि जगभरात त्यांची ख्याती होती. तर नीना गुप्ता यांना क्रिकेटची फार आवड होती आणि अनेकदा त्या क्रिकेट मॅच लाइव्ह पाहण्यासाठीही जायच्या. नागपुरात पार पडलेल्या एका सामन्यात भारताचा दोन धावांनी पराजय झाला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू विजयाचा जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी जेव्हा नीना यांनी कर्णधार विवियन रिचर्ड्स यांना पाहिलं, तेव्हा त्या प्रभावित झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

विवियन रिचर्ड्स हे त्यावेळी विजयामुळे फार खुश नव्हते. अगदी शेवटच्या क्षणी बाजी पलटली होती आणि त्याची जाणीव त्यांना होती. त्यांची हीच बाब नीना यांना आवडली होती. मॅचच्या एक दिवसानंतर जयपूरच्या राणीने वेस्ट इंडिजच्या टीमसाठी खास डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला त्यांनी संपूर्ण टीमला आमंत्रित केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

त्याचवेळी विनोद खन्ना यांच्या ‘बंटवारा’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. राणीने या चित्रपटाच्या टीमलाही डिनरला आमंत्रित केलं होतं. या चित्रपटात नीना गुप्ता यांचीही भूमिका असल्याने, त्यासुद्धा पार्टीला गेल्या होत्या. याच डिनर पार्टीत पहिल्यांदा नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची भेट झाली.

नीना यांनी या भेटीत विवियन यांची प्रशंसा केली आणि विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दोघांनी पुन्हा भेट घेण्याचं एकमेकांना आश्वासन दिलं होतं. मॅच संपल्यानंतर विवियन रिचर्ड्स त्यांच्या टीमसोबत निघून गेले आणि त्यादरम्यान पुन्हा दोघांची भेट झाली नाही. दोघांमध्ये त्यावेळी कोणताच संपर्क झाला नव्हता.

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

एकेदिवशी नीना जेव्हा दिल्ली एअरपोर्टवर पोहोचल्या होत्या, तेव्हा वेस्ट इंडिजची टीम त्यांना येताना दिसली. त्या टीममध्ये विवियन रिचर्ड्ससुद्धा होते. यावेळी जेव्हा दोघांची भेट झाली, तेव्हा दोघांच्याही हृदयात एकमेकांविषयी प्रेमाची भावना होती.

विवियन रिचर्ड्स हे विवाहित होते आणि त्यांना मुलंसुद्धा होती. ते नीना यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हते. सीरिज संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या देशाकडे निघून गेले. मात्र त्यावेळी फार उशीर झाला होता. नीना या प्रेग्नंट होत्या. प्रेग्नंट असल्याचं समजल्यावर त्यांनी विवियन यांना कॉल केला आणि त्याबद्दलची माहिती दिली. विवियन यांचा नकार असेल तर त्या गर्भपात करण्यासाठीही तयार होत्या. मात्र विवियन यांनी बाळाला जन्म देण्यास सांगितलं.

नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही नुकतीच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. या लग्नाला विवियन रिचर्ड्स यांनी खास हजेरी लावली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...