Vicky Katrina | पहिल्याच भेटीत विकीने सलमानसमोर कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी, व्हिडीओ व्हायरल

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नापूर्वी काही वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र त्याची कानोकान कोणाला खबर लागू नये, याची पूर्ण काळजी दोघांनी घेतली होती. या दोघांची पहिली भेट कशी झाली, हे जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच चाहत्यांना आहे.

Vicky Katrina | पहिल्याच भेटीत विकीने सलमानसमोर कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी, व्हिडीओ व्हायरल
Vicky Kaushal and Katrina Kaif Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 5:41 PM

मुंबई : अभिनेता विकी कौशल लवकरच ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सहअभिनेत्री सारा अली खानसोबत तो गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती, विविध शहरांमधील चाहत्यांशी भेट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी व्हिडीओ शूट करत हे दोघं चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात विकीने 2019 मधील कतरिनासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. खरंतर दोघांची ही पहिली भेट सर्वांनीच टेलिव्हिजनवर पाहिली होती. मात्र विकी आणि कतरिना तेव्हा पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते, हे कोणालाच माहीत नव्हतं. योगायोग म्हणजे त्या पहिल्या भेटीतच विकीने कतरिनाला लग्नाची मागणी घातली होती. तेसुद्धा अभिनेता सलमान खानसमोर.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नापूर्वी काही वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र त्याची कानोकान कोणाला खबर लागू नये, याची पूर्ण काळजी दोघांनी घेतली होती. या दोघांची पहिली भेट कशी झाली, हे जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच चाहत्यांना आहे. तर या दोघांची पहिली भेट ही एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. त्या अवॉर्ड शोमध्ये विकी कौशल हा अभिनेता आयुषमान खुरानासोबत मिळून सूत्रसंचालन करत होता. त्यातील एका सेगमेंटमध्ये स्टेजवर जी अभिनेत्री येईल, तिला लग्नासाठी प्रपोज करायचं, असं विकीच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं होतं.

पहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

पुरस्कार सोहळ्यातील पहिल्या भेटीविषयी विकी म्हणाला, “खरंतर हे कोणालाच माहीत नाही. नंतर कतरिना आणि माझा तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. पण खरंतर ती आमची पहिली भेट होती. फक्त त्यात विनोद असा होता की जी कोणती अभिनेत्री मंचावर येणार असेल, तिला मी प्रपोज करणार होतो. तशीच माझी स्क्रिप्ट होती.”

योगायोगाने कतरिनाच त्यावेळी मंचावर येते आणि विकी तिला म्हणतो, “तू एखाद्या चांगल्या विकी कौशलला शोधून लग्न का नाही करत? लग्नाचा सिझन सुरू आहे तर मला वाटलं की तुझीही इच्छा असेल तर विचारून घेऊयात.” हे ऐकून कतरिना आश्चर्यचकीत होऊन विकीला म्हणते, “काय?” तेव्हा विकी ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं गातो. विशेष म्हणजे हे सर्व घडताना सलमान खान प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसतो. विकी ज्यावेळी कतरिनाला प्रपोज करतो तेव्हा सलमान बाजूलाच बसलेल्या बहीण अर्पिता खानच्या खांद्यावर झोपल्याचं अभिनय करतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.