‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याने मुंबईच्या रस्त्यांवर मारला झाडू, शाहरुख खान याच्यासोबत खास कनेक्शन
Shah Rukh Khan : कोण आहे 'तो' पाकिस्तानी अभिनेता, ज्याच्यावर मुंबईच्या रस्त्यांवर झाडू मारण्याची आली वेळ? अभिनेत्याचं शाहरुख खान याच्यासोबत काय आहे कनेक्शन? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्याची चर्चा...
मुंबई | 6 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वातील अनेक अशा घटना आहेत, ज्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील अशाच एका घटनेची तुफान चर्चा रंगत आहे. सांगायचं झालं तर, परदेशातून अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी भारतात आले आणि त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केलं. एवढंच नाही तर, अनेक पाकिस्तानी कलाकारांनी देखील सिनेमांमध्ये काम करण्यासाठी भारतात पाऊल ठेवलं…. अशाच एका अभिनेत्यापैकी एक म्हणजे अली खान.. अली खान याने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण एकेदिवशी अभिनेत्याने मुंबईच्या रस्त्यांवर झाडू मारला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अली खान याचं बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत देखील खास कनेक्शन आहे.
अली खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने लोकप्रिय वेबसीरिज ‘द ट्रायल’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सीरिजमध्ये अभिनेत्री काजोल हिच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे अली खान चर्चेत आला. आज अली खान याचा 55 वा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
‘द ट्रायल’ वेबसीरिज नाही तर, अली खान याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘डॉन’ सिनेमात देखील अभिनेता झळकला होता.
दरम्यान एका मुलाखतीत अभिनेत्याने शाहरुख खान सोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला. मुंबईच्या रस्त्यांवर झाडू मारत असताना अली खान आणि शाहरुख खान याची भेट झाली होती.. असं खुद्द अली खान म्हणाला.. एका अभियानासाठी अली खान याला ‘गेटवे ऑफ इंडिया’ याठिकाणी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा शाहरुख खान देखील अभियानासाठी उपस्थित होता… मुंबई याठिकाणीच अली खान आणि शाहरुख खान यांची पहिली भेट झाली.
अली खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेता पाकिस्तानी मालिका ‘मेरे हमसफर’ मध्ये अभिनेत्री हानिया आमिर हिच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. पण सध्या सर्वत्र अली खान आणि शाहरुख खान यांच्या पहिल्या भेटीची चर्चा रंगली आहे.