Kangana Ranaut | पाकिस्तानी अभिनेत्रीने केले कंगना राणावत हिच्याबद्दल वादग्रस्त विधान, चाहत्यांमध्ये संताप, थेट कानाखालीच
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कंगना राणावत दिसते. अनेकदा कंगना राणावत ही तिच्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते. कंगना राणावत हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. मात्र, सोशल मीडियार केलेल्या पोस्टमुळे कंगना राणावत ही मोठ्या वादात देखील सापडते. विषय कोणताही असो कंगना राणावत आपले मत मांडताना फार काही विचार करताना दिसत नाही. कंगना राणावत हिने बाॅलिवूडमध्ये एक अत्यंत मोठा काळ हा गाजवला आहे. कंगना राणावत हिने हिट चित्रपट दिले आहेत.
बऱ्याच वेळा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार देखील असतात. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिच्या आईचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये कंगना राणावत हिची आई चक्क शेतामध्ये काम करताना दिसली. कंगना राणावत हिने शेअर केलेला हा फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
या फोटोसोबत कंगना राणावत हिने लिहिले की, मी इथून आलीये, यामुळे मी स्वाभिमानी आहे. कंगना राणावत हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसले. आता नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाह हिच्या निशाण्यावर कंगना राणावत ही आलीये. नौशीन शाह ही कंगना राणावत हिच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य करताना दिसलीये.
इतकेच नाही तर नौशीन शाह हिने थेट म्हटले की, मला कंगना राणावत हिच्या कानाखाली जाळ काढायचा आहे. नौशीन शाह ही नुकताच एका शोमध्ये पोहचली. यावेळी नौशीन शाह म्हणाली की, कंगना राणावत सतत पाकिस्तानवर टिका करताना दिसते. इतकेच नाही तर ती आमच्या सेनावर टिका करते.
कंगना राणावत हिला आमचा देश कसा आहे आणि आमची सेना कशी आहे याबद्दल काहीही माहिती नाहीये. मात्र, उगाच टिका करायची म्हणून ती टिका करते. मुळात म्हणजे कंगना राणावत हिने स्वत: च्या देशाकडे लक्ष द्यावे. इतर देशांमध्ये काय सुरू आहे याबद्दल तिला काय करायचे? मुळात म्हणजे एखाद्या देशाबद्दल वाईट का बोलावे.
कंगना राणावत हिने तिच्या चित्रपटांकडे, तिच्या अभिनयाकडे आणि तिच्या जुन्या अफेअर्सकडे लक्ष द्यावे. पुढे नौशीन शाह थेट म्हणाली की, मला कंगना राणावत हिच्या कानाखाली द्यावी वाटते. आता नौशीन शाह नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. आता कंगना राणावत ही नौशीन शाह हिच्या विधांनाचा काय समाचार घेते हे पाहण्यासारखे ठरेल.