AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण

'टाइमपास' या चित्रपटात दगडूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचं लग्न होणार असून केळवणाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लग्नाच्या तारखेची हिंट दिली आहे.

'दगडू'चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
प्रथमेश परब, क्षितिजा घोसाळकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 11:28 AM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | ‘टाइमपास’ या चित्रपटात दगडूची भूमिका साकारून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यात आता ‘प्राजू’ची कायमची एण्ट्री झाली आहे. प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधणार आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. प्रथमेश आणि क्षितिजा हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघंही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहेत. प्रथमेश आणि क्षितिजाचं केळवण नुकतंच पार पडलं आहे. त्याचाच फोटो पोस्ट करत त्याने लग्नाची घोषणा केली आहे.

‘#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (ता. क. – तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये अंदाज व्यक्त करा. तोवर नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)’, असं त्याने या केळवणाच्या फोटोसोबत लिहिलंय. या फोटोवर नेटकऱ्यांसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करत प्रथमेश आणि क्षितिजाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. प्रथमेश हा फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला डेट करतोय. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘टाइमपास’ या चित्रपटात ‘दगडू’ने ‘प्राजू’चं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्याची ही अनोखी प्रेमकहाणी सर्वांना खूप आवडली होती. खऱ्या आयुष्यात आता प्रथमेश क्षितिजासोबत संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रथमेशची होणारी पत्नी कोण?

व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत प्रथमेश परबने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यापूर्वीही दोघांचे सोबत फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी अंदाज बांधण्यास सुरुवात केलीच होती. प्रथमेशची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी क्षितिजा ही फॅशन डिझायनर आहे. त्याचसोबत ती बायोटेक्नॉलॉजिस्टसुद्धा आहे. प्रथमेशला ‘टाइमपास’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाशिवाय त्याने टकाटक 1, टकाटक 2, 35 टक्के काटावर पास, बालक पालक, डॉक्टर डॉक्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.