AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‌ॅमेझॉन प्राइम एक महिना मोफत दाखवणार दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे पाच सिनेमा

दिवंगत कन्नड अभिनेते आणि निर्माते पुनीत राजकुमार आज हयात नाही. तरीही त्यांची जबरदस्त फँन फॉलोइंग आहे. सिनेमा क्षेत्रात पुनीत राजकुमार यांचे योगदान आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून अँमेझॉन प्राइम त्यांचे पाच सिनेमा संपूर्ण एक महिना दाखवणार आहेत. विशेष म्हणजे प्राइम व्हिडीओ सबस्क्रीप्शन नसलेले प्रेक्षकही हे सिनेमे पाहू शकतात.

अ‌ॅमेझॉन प्राइम एक महिना मोफत दाखवणार दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे पाच सिनेमा
PUNIT RAJKUMAR
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 7:36 AM

मुंबई : कन्नड सिनेमाचे सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार (Punit Rajkumar) आज हयात नाही. 29 अॉक्टोबर 2021 ला ह्रदयविकाराच्या छटक्याने त्यांचे निधन झाले. पण त्यांचे चाहते अजूनही त्यांना विसरले नाही. सध्याही ते पुन्हा चर्चेत असल्याचे कारण म्हणजे अँमेझॉन प्राइमने (Amazon Prime video) केलेली घोषणा. पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या तीन महिन्यांनंतर पुनीत राजकुमारशी संबंधित विशेष घोषणा अँमेझॉन प्राइमने केली. अँमेझॉन प्राइमने आपल्या इंन्स्टाग्राम हँडलवर महत्त्वाची माहिती शेअर करत फेब्रुवारी महिन्यात पुनीत राजकुमार यांचे पाच प्रसिद्ध सिनेमा अ‌ॅमेझॉन प्राइमवर अगदी मोफत दाखवले जातील असे जाहीर केले.

‘ फ्री-टू- स्ट्रीम’ प्लाननुसार हे पाच सिनेमे बघता येतील

विशेष म्हणजे अ‌ॅमेझॉनची प्राइम सबस्क्रीप्शन नसलेल्यांनाही हे सिनेमा पाहता येतील. हे पाच सिनेमाचे निर्माते पुनीत राजकुमार यांची प्रॉडक्शन कंपनी ‘ पीआरके’ आहे. प्राइम व्हिडीओच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे अँमेझॉनवर खाते आहे ती सुद्धा ‘ फ्री-टू- स्ट्रीम’ प्लाननुसार हे पाच सिनेमे बघू शकतात. ‘ लॉ’, फ्रेंच बिरयानी’, ‘कवलुदारी’, ‘ मायाबाजार’ आणि ‘ युवारत्न’ हे ते पाच सिनेमा आहोत. ही पाचही सिनेमा 2019 ते 2021 दरम्यान रीलीज झाले होते. यापैकी केवळ ‘ युवारत्न’ मध्ये पुनीत राजकुमार मुख्य भूमिकेत होते. अन्य चार सिनेमात इतर कलाकार मुख्य भूमिकेत होते.हे पाच सिनेमे तुम्ही 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कोणत्याही प्राइम सबस्क्रीप्शनशिवाय अँमेझॉनवर बघू शकता.

सिनेमासृष्टीसाठी पुनीत राजकुमार यांचे योगदान खूप मोठे

याशिवाय प्राइम व्हिडीओवर पीआरके प्रॉडक्शनचे तीन सिनेमा ‘ मँन अॉफ द मँच’, ‘ वन कट टू कट’,’ फँमिली पँक’ यांनी याच प्लँटफॉर्मवर स्ट्रीम करण्याची घोषणा केली आहे. जागरणच्या माहितीनुसार, पीआरके प्रॉडक्शन सोबत काम करताना अँमेझॉन प्राइम व्हिडीओचे कंन्टेन्ट लाइसेंसिंग हेड मनीष सि़ंघानी म्हणाले की, दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांच्याशी अजूनही जवळीक वाटते. पुनीत राजकुमार यांचा क्रिएटिव्ह एक्सलन्स आणि स्टोरीटेलिंगचा दृष्टिकोनाला श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न आहे. सिनेमासृष्टीसाठी पुनीत राजकुमार यांचे योगदान खूप मोठे आहे. भारत आणि भारताबाहेरही त्यांचे फँन्स आणि प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल असा विश्वास मनीष यांनी व्यक्त केला.

सिनेमा दाखवून पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली:

सिनेमाप्रती पुनीत राजकुमार यांच्या व्हिजनला प्रेक्षकांना नेहमीच चकित केले आहे. त्याच प्रभावातून पुनीत राजकुमार यांची फँन फॉलोइंग मोठी आहे. ते प्रेक्षकांचा सन्मानास पात्र ठरले. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या तिन्ही सिनेमांची घोषणा दिवंगत अभिनेता आणि निर्माते पुनीत राजकुमार आणि त्यांच्या कलेप्रती असलेला आदर याला श्रद्धांजली आहे. सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान मोठे आहे असे पीआरके कंपनीच्या निर्मात्या आणि पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार म्हणाल्या.

इतर बातम्या :

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, थोडक्यात निभावलं! नेमकं काय घडलं?

Video | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट! ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं?

सलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूल‍िया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.