धर्मेंद्रला ट्रोलरने विचारला प्रश्न, आप पागल तो नहीं हो गए; यावर धर्मेंद्रचं मजेदार उत्तर

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित एक पोस्ट केली होती. या ट्विटवर त्यांच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्रही यातील अनेक चाहत्यांना रिप्लाय देत होते.

धर्मेंद्रला ट्रोलरने विचारला प्रश्न, आप पागल तो नहीं हो गए; यावर धर्मेंद्रचं मजेदार उत्तर
धर्मेंद्र ( फाइल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 1:06 PM

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सोशल मीडियावर (social media) प्रचंड अॅक्टिव्ह असतात, ते तुम्ही पाहिलं सुध्दा असेल. ते त्यांच्या अकाऊंटवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी मजेशीरपणे देत असतात. काही दिवसांपुर्वी सलमान खान (salman khan) यांच्याबाबत एका ट्रोलरने (troller)धर्मेंद्र याला एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी किती मिश्कीलपणे उत्तर दिलं होतं हे सगळ्यांना माहित आहे. नुकतेच एका ट्रोलरने त्यांना धर्मेंद्र यांना प्रश्न विचारला त्यांचं उत्तरही त्यांच्याकडून मजेदार दिल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं आहे. त्या ट्रोलरने विचारलं होतं की. आप पागल तो नहीं हो गए, यावर धर्मेंद्र यांनी “पागलपन से ही जिंदगी में इंकलाब आता है.” असं उत्तर दिल्याने त्याची चर्चा झाली होती.

ट्वीट होतंय व्हायरल

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित एक पोस्ट केली होती. या ट्विटवर त्यांच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्रही यातील अनेक चाहत्यांना रिप्लाय देत होते. यावर अक्षय नावाच्या युजरने सर, एवढ्या रात्री जागे राहणे आरोग्यासाठी चांगले नाही, असे उत्तर दिले. धर्मेंद्र म्हणाले की, झोपेलाही त्रास होतो, अक्षयला कधी कधी ते सहन करावे लागते.

धर्मेंद्रचं ट्रोलरला उत्तर

काही दिवसांपूर्वी एका युजरने सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त धर्मेंद्रला विचारले होते की, तुम्ही सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा का दिल्या नाहीत. त्यावेळी धर्मेंद्रने सलमानला साप चावण्याच्या घटनेचा संदर्भ देत त्याच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.

धर्मेंद्र या चित्रपटात दिसणार धर्मेंद्र सध्या करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत अनेक दिवस चालले होते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून अनेक वर्षांनी करण जोहर दिग्दर्शन क्षेत्रात कमबॅक करणार आहे.

‘बधाई दो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ट्रेलरमधील कॉमेडी लोकांच्या पसंतीला

सरोगसीबाबतचं ‘ते’ विधान प्रियांका चोप्रा आणि निक जोनसबद्दल नव्हतं, चौफेर टीकेनंतर लेखिका तसलीमा नसरीन यांचं स्पष्टीकरण

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.