पतीवर गंभीर आरोप, ‘तो’ फोटो दलजीत कौरने केला शेअर, आता चाहत्यांकडून..
अभिनेत्री दलजीत कौर हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत कौर हिने काही दिवसांपूर्वीच पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. दलजीत कौर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. नुकताच दलजीत कौरने एक फोटो शेअर केलाय. ज्यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
अभिनेत्री दलजीत कौर ही कायम चर्चेत असते. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दलजीत कौर ही लग्नानंतर निखिल पटेल याच्यासोबत केन्यामध्ये शिफ्ट झाली होती. हेच नाही तर लग्नाच्या अगोदरही दलजीत कौर हिने स्पष्ट केले होते की, आपल्या मुलासोबत ती केन्यामध्ये शिफ्ट होईल. मात्र, अचानक दलजीत कौर ही मुलासोबत भारतामध्ये परतली. त्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. पहिल्यांदाच एका मुलाखतीमध्ये दलजीत कौर हिने पतीवर काही गंभीर आरोप केले. त्यानंतर निखिल पटेल यानेही दलजीत कौरवर आरोप केले.
दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यामधील वाद सुरू असतानाच आता दलजीत कौरने एक फोटो शेअर करत खास कॅप्शनही शेअर केले. आता दलजीत कौर हिने शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. दलजीत कौर हिने इंस्टा स्टोरीवर खास फोटो शेअर केलाय. यामुळे आता अखेर दलजीत कौर हिच्या मनात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
हेच नाही तर या फोटोमध्ये चक्क गळ्यात मंगळसूत्र दलजीत कौरने घातल्याचे दिसतंय. या फोटोवरून हे दिसतंय की, दलजीत कौर हिला निखिलची आठवण येतंय. दलजीत कौर आणि निखिल यांच्या नात्यात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. निखिल पटेल याने दलजीत कौर हिने केन्या का सोडला हे थेट सांगून टाकलंय.
हेच नाही तर ज्यावेळी ती घर सोडून गेली, त्याचवेळी आपले नात संपल्याचे त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले. हेच नाही तर दलजीत कौर हिने निखिल पटेलवर गंभीर आरोप केले आणि त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिने म्हटले. फोटोसोबतच तिने एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय.
दलजीत कौर हिचे निखिल पटेलसोबतचे हे दुसरे लग्न असून शालिन भनोट असे तिच्या पहिल्या पतीचे नाव आहे. दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौर ही मुलाचा सांभाळ करते. दलजीत कौर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत कौर हिचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचेही सातत्याने सांगितले जातंय.