Uday Chopra | आईच्या निधनानंतर हसताना दिसल्याने उदय चोप्रा ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘रिसेप्शन पार्टी आहे का?’

'आईच्या निधनानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. थोडीतरी लाज बाळगली पाहिजे', असं एकाने लिहिलंय. तर 'आईच्या निधनावर असणारी ही अशी कशी व्यक्ती आहे. असे हसून गळाभेट घेत आहेत, जसं की रिसेप्शन पार्टी चालू असेल', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Uday Chopra | आईच्या निधनानंतर हसताना दिसल्याने उदय चोप्रा ट्रोल; नेटकरी म्हणाले 'रिसेप्शन पार्टी आहे का?'
Uday ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 12:57 PM

मुंबई : बॉलिवूडचे दिवंगत निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. पामेला यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार पोहोचले होते. पामेला या अभिनेता उदय चोप्रा आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या आई होत्या. तर अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची सून आहे. सध्या सोशल मीडियावर उदय चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो हसताना दिसत असून त्यावरून नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

पामेला यांच्या निधनानंतर कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेता आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव उदयची गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी उदय हसत हसत त्यांची भेट घेतो. हेच पाहून नेटकरी भडकले आहेत. पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘आईच्या निधनानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. थोडीतरी लाज बाळगली पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आईच्या निधनावर असणारी ही अशी कशी व्यक्ती आहे. असे हसून गळाभेट घेत आहेत, जसं की रिसेप्शन पार्टी चालू असेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. कमेंट बॉक्समध्ये काहींनी उदयचीही बाजू घेतली. ‘त्याच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर तो त्याच्या आईवर प्रेम करत नाही असा अर्थ होत नाही. त्याला माहीत आहे की हसत हसत अलविदा केलं तर आईसुद्धा समाधानी मनाने जाऊ शकेल’, असं नेटकऱ्याने म्हटलंय. याआधीही उदयला त्याच्या दिसण्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं.

पहा व्हिडीओ

एकीकडे काहींनी उदयला ट्रोल केलं, तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी ट्रोल करणाऱ्यांनाच खडेबोल सुनावले. ‘मित्रांनो, त्याने त्याच्या आईला गमावलंय. त्याचं सांत्वन करू शकत असाल तर करा अन्यथा त्याची खिल्ली उडवणं बंद करा’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही सहवेदना व्यक्त करू शकत नसाल तर किमान मस्करी करणं तरी थांबवा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘थोडीतरी माणुसकी जपा’ अशा शब्दांत काही नेटकऱ्यांनी ट्रोलर्सना सुनावलंय.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या यशराज फिल्म्सच्या ‘द रोमँटिक्स’ या डॉक्युमेंट्रीत पामेला यांची शेवटची झलक दिसली होती. पार्श्वगायिका, लेखन, निर्मिती अशा क्षेत्रांत त्यांचा हातखंडा होता. यशराज फिल्म्सच्या अनेक चित्रपटांसाठी गायन, लेखन, वेशभूषाकार आणि सहनिर्माता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.