‘Officially Confirmed’, ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
Aishwarya Rai | ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट? बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत..., गेल्या अनेक दिवसांपून ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या नात्याची... खरंच दोघांचे मार्ग झालेत वेगळे?
मुंबई | 4 मुंबई 2023 : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी कपलने घटस्फोट घेत, स्वतःचे मार्ग वेगळे केले. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया, चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. चहत्यांना कायम कपल गोल्स देणाऱ्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. दरम्यान, ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरत असताना एका प्रसिद्ध सेलिब्रिटीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा वादग्रस्त चित्रपट विश्लेषक उमेर संधू याने ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाबाबतीत ट्विट केलं आहे. सध्या सर्वत्र उमेर याच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ‘अभिषेक – ऐश्वर्या यांचं अधिकृत घटस्फोट झालं आहे…’ असं ट्विट उमेर याने केलं आहे. ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील नेटकऱ्यांनी केली आहे.
Officially Confirmed, #AbhishekBachchan & #AishwaryaRaiBachchan “ DIVORCED ” Couple now⚡️⚡️🌪️ pic.twitter.com/G1mhCe9YN9
— Umair Sandhu (@UmairSandu) November 29, 2023
सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसत नाहीत. कार्यक्रम किंवा कोणत्याही ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते. नुकताच ऐश्वर्या हिचा वाढदिवस झाला. तेव्हा ऐश्वर्या हिच्यासोबत फक्त आई आणि मुलगी होती. अभिषेक बच्चन याने देखील सोशल मीडियावर फक्त पत्नीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. अशात दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं..
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिवाळीमध्ये देखील ऐश्वर्या ‘जलसा’ बंगल्यात नसल्याची माहिती समोर आली. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक आणि बच्चन कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, समोर येत असलेल्या अनेक गोष्टींमुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.
ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं
अभिनेता सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये फार कमी लोकांच्या उपस्थितीत ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. पण आता दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.