ReKha | जेव्हा रेखा यांचं लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याला मंदिरातून काढलं बाहेर; रात्री १० वाजता घडलेला ‘तो’ प्रसंग म्हणजे…

ReKha | रेखा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग... रात्री १० वाजता घडलेली 'ती' घटना, तेव्हा रेखा यांचं लग्न तर झालं, पण मंदिरातून पुजाऱ्याला बाहेर काढल्यानंतर मात्र... सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

ReKha | जेव्हा रेखा यांचं लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याला मंदिरातून काढलं बाहेर; रात्री १० वाजता घडलेला 'तो' प्रसंग म्हणजे...
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 11:25 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रेखा अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, त्यांचं खासगी आयुष्य कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. आता देखील रेखा त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या आहेत. रेखा यांचं लग्न तर झालं, पण फार काळ त्यांचं लग्न टिकलं नाही. अखेर त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखा यांचं लग्न झालं होतं. रेखा आणि मुकेश यांची पहिली भेट दिल्ली याठिकाणी एका पार्टीमध्ये झाली होती. मुकेश अग्रवाल पहिल्याच नजरेत रेखा यांच्या प्रेमात पडले होते…

दोघांच्या भेटीला एक महिना देखील उलटला नव्हता. ४ मार्च १९९० साली सुरिंदर कौर यांच्यासोबत मुकेश अग्रवाल थेट रेखा यांच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच मुकेश यांनी रेखा यांच्याकडे लग्नाची मागणी घातली. अशात सुरिंदर कौर यांच्यामुळे रेखा यांनी देखील लग्नासाठी होकार दिला.

लग्नाबद्दल रेखा म्हणाल्या होत्या की, ‘मुकेश प्रचंड आनंदी होते. ते तात्काळ लग्नासाठी तयार झाले होते.’ दोघांचं कुटुंब मुंबईमध्ये नव्हतं. पण दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नासाठी रेखा देखील लाल आणि गोल्डन कांजीवरम साडीत तयार झाल्या होत्या. शिवाय रेखा यांनी आवडीचे दागिने देखील घातले होते.

हे सुद्धा वाचा

लेखक यासिर उस्मान याने रेखा यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकात त्यांच्या लग्नाचा देखील खुलासा केला आहे. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, लग्नासाठी मुकेश आणि रेखा घरा बाहेर पडले. जुहू याठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात प्रचंड गर्दी असल्यामुळे समोर असलेल्या मुक्तेश्वर देवायल मंदिराबाहेर दोघांचं लक्ष गेलं.

मुकेश आणि रेखा जेव्हा लग्नासाठी बाहेर निघाले तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. मंदिरातून पुजारी झोपण्यासाठी गेले होते. मुकेश यांनी पुजाऱ्याला उठवलं आणि लग्न करायचं आहे… असं सांगितलं. समोर वधूच्या रुपात रेखा यांना पाहिल्यानंतर पुजारी देखील हैराण झाले.

दरम्यान, मंदिराचा एक नियम होता. आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद राहतील. पण त्या रात्री मंदिराचे नियम मोडण्यात आले. या चुकीमुळे पुजाऱ्याला मंदिरातून बाहेर काढण्यात आलं… अशा देखील चर्चा रंगल्या होत्या.. रात्री १०.३० वाजता लग्नाच्या विधी सुरु झाल्या आणि मुकेश आणि रेखा लग्न बंधनात अडकले.

यासिर उस्मान यांनी या नत्याबद्दल पुस्तकात म्हटलं आहे की, ‘लाहनपणी रेखा यांच्या वडिलांनी कधीही त्यांनी मुलीचा दर्जा दिला नाही.. लग्नानंतर रेखा यांना स्वतःचं नाव मिळालं होतं..’ रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.