Urfi Javed | डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उर्फीने केली ट्रीटमेंट; झाला उलटाच परिणाम

उर्फीने बडे भैय्या की दुल्हनियाँ, चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, सात फेरों की हेरा फेरी, बेपनाह आणि डायन यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Urfi Javed | डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उर्फीने केली ट्रीटमेंट; झाला उलटाच परिणाम
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 1:15 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : सुंदर दिसण्यासाठी तरुण-तरुणींकडून मेकअपचे अनेक प्रॉडक्ट्स वापरले जातात. टेलिव्हिजन किंवा फिल्म इंडस्ट्रीत सुंदर दिसण्याला किती महत्त्व आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. ग्लॅमरच्या विश्वात स्वत:चं सौंदर्य जपण्यासाठी किंवा आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी किंवा फिलर्सचा पर्याय निवडतात. इंडस्ट्रीतल्या कलाकारांसाठी ही अत्यंत सर्वसामान्य बाब आहे. मात्र सर्जरी किंवा फिलर्स योग्य पद्धतीने झाले नाहीत तर त्यांचा चेहराही बिघडू शकतो. असंच काहीसं अभिनेत्री उर्फी जावेदसोबत झालं आहे. उर्फीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नो-मेकअप लूक असलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. डोळ्यांखालील काळ्या डागमुळे सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याने अंडर-आय फिलर्सचा पर्याय निवडल्याचा खुलासा तिने या पोस्टमध्ये केला आहे. मात्र अंडर-आय फिलर्सनंतर तिचा चेहरा वेगळाच दिसू लागला आहे.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे ओळखली जाते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीमध्ये ती थेट फोनच्या कॅमेरामध्ये पाहताना दिसतेय. या सेल्फीसोबतच तिने लिहिलंय, ‘डार्क सर्कल्समुळे मला खूप ट्रोल गेलंय. म्हणून मी अंडर-आय फिलर्स केले आणि आता माझा चेहरा आणखीच खराब दिसू लागलाय. दोन्ही डोळ्यांखालील भाग वेगवेगळं आणि विचित्र दिसू लागलं आहे. आता मेकअपसुद्धा माझ्या डोळ्यांखालील हा विचित्र भाह झाकू शकत नाही. मी हे माझ्यासोबत का असं केलंय?’

हे सुद्धा वाचा

उर्फीला नुकतंच पापाराझींनी जिमबाहेर पाहिलं. यावेळी ती पापाराझींपासून चेहरा लपवत पटकन जाऊन कारमध्ये बसली. यामागचं कारण म्हणजे तिला तिचा नो-मेकअप लूक दाखवायचा नव्हता. मात्र नंतर जेव्हा तिने स्वत:चा हा फोटो पोस्ट केला, तेव्हा नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करू लागले.

उर्फीने बडे भैय्या की दुल्हनियाँ, चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, सात फेरों की हेरा फेरी, बेपनाह आणि डायन यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली होती. त्यानंतर ती एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या चौदाव्या सिझनमध्येही झळकली होती.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.