उर्फी जावेद भडकली, तुम्ही फॅशनचा अभ्यास कुठून केला? विवेक अग्निहोत्रींना केला खडा सवाल
बॉलिवूडमधील दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकताच कान्समधील ऐश्वर्या रायचा फोटो शेअर करताना एक विधान केले. ज्यावर आता उर्फी जावेदने प्रत्युत्तर दिले.
Vivek Agnihotri And Urfi Javed : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे आपल्या नवनवीन विधानांमुळे वादाला तोंड देत असतात. ‘द कश्मीर फाइल्स’ बनवल्यापासूनच विवेकच्या वक्तव्यांमुळे ते कधी लोकांच्या तर कधी स्टार्सच्या निशाण्यावर येतात. बॉलीवूडमध्ये बनवलेले चित्रपट आणि स्टार्सबद्दल विवेक अग्निहोत्रीही कमेंट करताना दिसतात. अशातच पुन्हा एकदा विवेक यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र त्यामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) खूप भडकली आहे.
खरंतर, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून भारतात परतली आहे. कान्समध्ये नेहमीप्रमाणे ऐश्वर्याचा चार्म पाहायला मिळाला. जेव्हा ऐश्वर्या तिच्या वेगळ्या पोशाखात रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा तिला मदत करण्यासाठी ‘कॉस्च्युम स्लेव्ह्स’ची गरज होती. विवेकने या ‘कॉस्च्युम स्लेव्ह्स’बद्दल भाष्य केले होते. दिग्दर्शकाने ऐश्वर्या राय बच्चनच्या फॅशन सेन्सची तसेच तिला मदत करणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली.
Have you guys heard of a term called ‘Costume Slaves’. They are mostly girls (a suited man in this case). You can see them now in India too with almost every female celeb. Why are we becoming so stupid and oppressive just for such uncomfortable fashion? pic.twitter.com/bWYavPYjvS
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023
मात्र विवेक अग्निहोत्री यांचे हे वक्तव्य उर्फी जावेदला फारसे आवडलेले दिसत नाहीये. तिनेही त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत विवेक यांना फॅशनचा धडा शिकवला आहे. आपल्या असामान्य आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदने दिग्दर्शकाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटवर उर्फीनेही कमेंट केली आहे. तिने त्यांचे ट्विट रिट्विट करत तिचे म्हणणे मांडले आहे. ‘ मला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली आहे ? तुम्हाला पाहून अस वाटतं की तुम्हाला फॅशनची खूप समज आहे. फॅशन चित्रपटाचं दिग्दर्शन तुम्ही (च) करायला हवं होतं.’ अशा शब्दांत उर्फीने विवेक यांना फटकारले आहे.
Mai jaan na chalti hu Aapne kaunse fashion school se apni degree lee Hai? Aapko delh k lagta hai aapko fashion ki kaafi samajh hai , fashion movie aapko direct karni chahiye thi ! https://t.co/QQcPwTvn5g
— Uorfi (@uorfi_) May 19, 2023
तिच्या उत्तरासाठी उर्फीला युजर्सचा पाठिंबाही मिळत आहे. ऐश्वर्या रायचा फोटो शेअर करताना, लोक कसे अनकंफर्टेबल फॅशनकडे कसे वळत आहेत, याबद्दल त्यांनी कमेंट केली होती. यासोबतच त्यांनी कॉस्च्युम स्लेव्ह्स ही संज्ञाही अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली. विवेक अग्निहोत्रीची ही पद्धत लोकांना आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा होत आहे.
त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी सारवासारव करत माझ्या कमेंटचा ऐश्वर्या राय बच्चनवर रोख नव्हता. मी तिच्याबद्दल नव्हे तर कॉस्च्युम स्लेव्हरी बद्दल बोलत होतो, असे नमूद केले.
My comment has nothing to do with ARB. It’s only about the weird concept of ‘costume slavery’. And ARB is not responsible for it. She is just a model/fashion ambassador.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023