Lalitpur: ‘अशा नराधमांना भरचौकात मारलं पाहिजे’; उत्तरप्रदेशातील ललितपूर बलात्कार प्रकरणावर रितेशची संतप्त प्रतिक्रिया

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त होत आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली.

Lalitpur: 'अशा नराधमांना भरचौकात मारलं पाहिजे'; उत्तरप्रदेशातील ललितपूर बलात्कार प्रकरणावर रितेशची संतप्त प्रतिक्रिया
Riteish Deshmukh Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 9:44 AM

उत्तरप्रदेशमधील ललितपूर (Lalitpur Rape Case) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकार गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यानेच (UP Cop) तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त होत आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. रितेशने याप्रकरणी ट्विट केलं असून घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘रक्षकच भक्षक बनल्यास सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जावं’, असा सवाल त्याने केला.

रितेश देशमुखचं ट्विट-

‘जर हे खरं असेल तर याहून घृणास्पद काहीच असू शकत नाही. रक्षकच भक्षक बनल्यास सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जावं? अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे. सरकारने याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी’, अशी मागणी रितेशने या ट्विटद्वारे केली.

हे सुद्धा वाचा

22 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र न्याय मिळण्याऐवजी तिला छळालाच बळी पडावं लागलं. तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख टिळकधारी सरोजनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आपली कहानी एसपींना सांगितली आणि त्यानंतर ही कारवाई केली जात आहे. यानंतर ललितपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पाठक यांनी सांगितले की, पाली इथले रहिवासी असलेल्या चार मुलांनी त्या 13 वर्षीय मुलीला कथितपणे आमिष दाखवलं होतं. तर 22 एप्रिल रोजी तिला भोपाळला नेलं आणि तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.