‘या’ प्रसिद्ध गायिकेला पोलिसांची नोटीस, गंभीर आरोप; 7 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दिली डेडलाईन

'या' प्रसिद्ध गायिकेच्या अडचणीत मोठी वाढ; पोलिसांचे सात प्रश्न; पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवर तीन दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास गायिकेवर कारवाई होण्याची शक्यता, नक्की काय आहे प्रकरण?

'या' प्रसिद्ध गायिकेला पोलिसांची नोटीस, गंभीर आरोप; 7 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दिली डेडलाईन
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:50 AM

singer neha singh rathore : उत्तर प्रदेश येथील कानपूर देहात पोलिसांनी ‘यूपी में का बा’ (up mein ka ba song) गाणं गाणारी लोकप्रिय गायिक नेहा सिंह राठोर (neha singh rathore) हिच्या दिल्ली येथील घरी नोटीस पाठवली आहे. नुकताच नेहा हिने कानपूर देहात अग्निकांडवर आधारित ‘का बा सीजन-2’ गाणं गायलं होतं. ‘का बा सीजन-2’ गाणं गायल्यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप गायिकेवर लावण्यात आला आहे. ज्यामुळे नेहाला पोलिसांकडून नोटीस पाठलण्यात आली आहे. एवढंच नाही तर, पाठवलेल्या नोटीसमध्ये सात प्रश्न विचारण्यात आले आहेत. नोटीसमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण तीन दिवसांत मागण्यात आलं आहे. नाहीतर नेहा विरोधात कारवाई होवू शकते.. असं सांगण्यात येत आहे.

नेहाला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी गायिकेला विचारलं आहे की, तिने गायलेली गाणी तिने स्वत: लिहिली आहेत की इतर कोणीतरी लिहिली आहेत. गायलेली आणि लिहिलेली गाणी कोणत्या आधारावर लिहिली आहेत. या प्रश्नांवर स्पष्टीकरण न दिल्यास पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील. असं देखील सांगण्यात आलं आहे. (neha singh rathore instagram)

पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये विचारण्यात आलेले सात प्रश्न

– व्हिडीओमध्ये तुम्ही स्वतः आहात की नाही?

– जर व्हिडीओमध्ये स्वतः तुम्ही आहात, तर ‘यूपी में का बा सीझन 2’ गाणं तुमच्या YouTube चॅनेलवर आणि स्वत:च्या ईमेल आयडीने ट्विटरवरुन पोस्ट केला आहे की नाही?

– नेहा सिंह राठोर आणि ट्विटर अकाउंट @nehafolksinger तुमचा आहे की नाही? असेल तर तुम्ही अकाउंटचा वापर करता की नाही?

– व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या शब्द तुम्ही स्वतः लिहिले आहेत की नाही?

– गाणं स्वतः लिहिलं आहे, तर तुम्ही गाण्याला प्रमाणित करता किंवा नाही?

– जर गाण दुसऱ्याने लिहिलं आहे, तर तसा तुम्ही उल्लेख केला आहे की नाही?

– गाण्यातून निर्माण झालेल्या अर्थाचा समाजावर होणारा परिणाम तुम्हाला माहीत आहे की नाही?

सांगायचं झालं तर खुद्द नेहा सिंह राठोर हिने तिच्या ट्विटर अकांउट आणि यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोलिसांनी नोटीस दिल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये नेहा पोलिसांना म्हणत आहे की, ‘कोण तुम्हाला इतका त्रास देत आहे?’ यावर पोलीस म्हणतात, ‘तुम्ही आम्हाला त्रास देत आहात…’ चर्चा झाल्यानंतर पोलीस नोटीसवर नेहा हिची सही घेतात. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (up police issue notice to singer neha singh rathore)

Non Stop LIVE Update
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.