AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | उर्फी जावेदने हद्दच केली पार; भर कार्यक्रमात घातला ट्रान्सपरंट ड्रेस, भडकले नेटकरी

उर्फी तिच्या बहिणींसोबत घरातून पळाली आणि लखनऊला गेली होती. लखनऊला ती लहान मुलांना शिकवून, क्लासेस घेऊन घराचं भाडं भरायची. त्यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. मात्र तिला त्यात काहीच रस नव्हता.

Urfi Javed | उर्फी जावेदने हद्दच केली पार; भर कार्यक्रमात घातला ट्रान्सपरंट ड्रेस, भडकले नेटकरी
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:12 AM

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद दररोज तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत येते. ट्रोलिंगला न जुमानता उर्फी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अत्यंत बोल्ड कपडे घातलेली दिसते. तिने मुंबईत पार पडलेल्या नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचा ड्रेस पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. इतकंच नव्हे तर पापाराझींनाही तिचे व्हिडिओ किंवा फोटो न काढण्याची विनंती केली आहे.

मुंबईतील या कार्यक्रमात उर्फीने जाळीचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. उर्फी अशा वस्तूंपासून ड्रेस बनवते, ज्याची कल्पनासुद्धा सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. कधी सिम कार्ड, कधी काच, कधी वर्तमानपत्र तर कधी फुलं यांपासून तिने अजब ड्रेस आजवर बनवले आहेत. त्यावर तिने बोल्ड फोटोशूटसुद्धा केले आहेत. आता उर्फीने जाळीपासून बनवलेला ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे. मात्र हा ड्रेस इतका ट्रान्सपरंट आहे की, ते पाहून नेटकरी भडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘हिच्या मेंदूचा कोणीतरी उपचार करा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘पापाराझींनी हे सगळं कव्हर करणं सोडलं पाहिजे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘फॅशनच्या नावावर ही काहीही करतेय, हिला नर्कातही जागा मिळणार नाही’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

पहा व्हिडीओ-

“मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला मारायचे”

उर्फीने नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने वडिलांनी केलेल्या मारहाणीचा खुलासा केला आहे. “माझे वडील जुन्या विचारसरणीचे आहेत आणि माझ्या आईचं फार कमी वयात लग्न झालं होतं. मला लहानपणी माझे वडील खूप मारायचे. इतर मुलींपेक्षा मी तेव्हा जास्त आत्मविश्वासू आणि थोडी वेगळी होती. कधी कधी वडील मला इतकं मारायचे की मी बेशुद्ध व्हायची. माझ्या आईचा राग ते अनेकदा माझ्यावर काढायचे. अखेर एका क्षणाला असं वाटलं की पुरे आता. यापुढे आणखी सहन होणार नाही”, असं ती म्हणाली.

उर्फी तिच्या बहिणींसोबत घरातून पळाली आणि लखनऊला गेली होती. लखनऊला ती लहान मुलांना शिकवून, क्लासेस घेऊन घराचं भाडं भरायची. त्यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. मात्र तिला त्यात काहीच रस नव्हता. दिल्लीहून नंतर ती मुंबईला आली आणि पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. मुंबईत काही ऑडिशन्स दिल्यानंतर उर्फीला टेलिव्हिजनवर छोट्या भूमिका मिळाल्या.

बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.