Urfi Javed | नेटकऱ्यांना पहिल्यांदा आवडला उर्फी जावेदचा ड्रेस; चक्क नेहा धुपियानेही केली ड्रेसची मागणी
'आतापर्यंत पाहिलेला हा सर्वांत क्युट ड्रेस आहे', अशी कमेंट अभिनेत्री नेहा धुपियाने केली. त्याचसोबत तिने उर्फीकडे या ड्रेसची मागणी केली आहे. उर्फीने पहिल्यांदाच फॅमिली फोटो शेअर केला आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाहू शकतात, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी साखळ्यांनी तर कधी वर्तमानपत्राने बनवलेले तिचे अतरंगी ड्रेस नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. अनेकदा उर्फीला तोकड्या कपड्यांमुळे, अंगप्रदर्शनामुळे आणि अजब गजब फॅशन सेन्समुळे ट्रोल केलं जातं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती दररोज वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पापाराझींसमोर येते. आता पहिल्यांदाच असं झालंय की उर्फीचा एखादा ड्रेस नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. होय, हे खरंच आहे. उर्फीचा हा ड्रेस नेटकऱ्यांसोबत अभिनेत्री नेहा धुपियालाही प्रचंड आवडला आहे. इतकंच नव्हे तर तिने उर्फीकडे या ड्रेसची मागणी केली आहे.
मंगळवारी उर्फी जेव्हा पापाराझींसमोर आली, तेव्हा सर्वजण तिचा नवीन ड्रेस पाहून थक्क झाले होते. कारण हा ड्रेस लहान मुलांच्या बाहुल्यांपासून बनवलेला आहे. तिने पिवळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि त्यावर बाहुल्यांपासून बनवलेला जॅकेट परिधान केला आहे. छोट्या-छोट्या रंगीबेरंगी बाहुल्यांपासून तयार झालेला जॅकेट नेटकऱ्यांनाही खूप आवडला. एका पापाराझी अकाऊंटवर उर्फीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘पहिल्यांदाच मला तुझे कपडे आवडले’, असं एकाने लिहिलं. तर ‘या मुलीच्या डिझायनरला अवॉर्ड दिला पाहिजे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘आश्चर्यकारकपणे हा अत्यंत अनोखा ड्रेस आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं. तर ‘आतापर्यंत पाहिलेला हा सर्वांत क्युट ड्रेस आहे’, अशी कमेंट अभिनेत्री नेहा धुपियाने केली. त्याचसोबत तिने उर्फीकडे या ड्रेसची मागणी केली आहे. उर्फीने पहिल्यांदाच फॅमिली फोटो शेअर केला आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाहू शकतात, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
उर्फीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिचा इथपर्यंतचा प्रवास सांगितला होता. ती तिच्या बहिणींसोबत घरातून पळाली होती. तिथून ती लखनऊला गेली आणि लहान मुलांना शिकवून, क्लासेस घेऊन घराचं भाडं भरायची. त्यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. मात्र तिला त्यात काहीच रस नव्हता. दिल्लीहून नंतर ती मुंबईला आली आणि पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. मुंबईत काही ऑडिशन्स दिल्यानंतर उर्फीला टेलिव्हिजनवर छोट्या भूमिका मिळाल्या.