Urfi Javed: उर्फी जावेद-चाहत खन्नामध्ये खडाजंगी; एकमेकींना चांगलंच सुनावलं

उर्फी जावेद-चाहत खन्नामध्ये खडाजंगी; एकमेकींना चांगलंच सुनावलं

Urfi Javed: उर्फी जावेद-चाहत खन्नामध्ये खडाजंगी; एकमेकींना चांगलंच सुनावलं
उर्फी जावेद, चाहत खन्नाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:37 PM

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चाहत खन्ना (Chahatt Khanna) यांच्यातील वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये. या दोघी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एकमेकांशी भिडल्या आहेत. अलीकडेच 200 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत चाहत खन्नाचं नाव जोडलं होतं. त्यानंतर उर्फीने तिला डिवचलं. यावर चाहतनेही उर्फीला प्रत्युत्तर दिलं. ‘तू तर आई, पत्नी आणि काकू होण्याच्या योग्यतेचीही नाही,’ असं ती म्हणाली. आता उर्फीने चाहतच्या या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

चाहत खन्नाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. यात तिने लिहिलं होतं, ‘सत्य जाणून न घेता केवळ प्रसिद्धीसाठी एखाद्या प्रकरणात उडी मारणं म्हणजे स्वत:ला मूर्ख बनवण्यासारखं आहे. मूर्खाशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? अक्कल असती तर काम केलं असतं किंवा शूटिंग केलं असतं. फक्त सेमी न्यूड कपडे घालून फिरत बसले नसते. तू काकू, पत्नी किंवा आई होण्याच्या योग्यतेचीही नाहीस. इतरांना आंटी म्हणण्यातून आनंद घे. अल्लाह तुला समज देवो.’

हे सुद्धा वाचा

उर्फी जावेदनेही चाहत खन्नाच्या कमेंटला लगेच प्रतिसाद दिला. उर्फीने चाहतच्या इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर लिहिलं, ‘फक्त सेमी न्यूड या शब्दांवर लक्ष केंद्रीत करा.’ यानंतर उर्फीने चाहतचे अनेक बोल्ड फोटोशूट दाखवले.

यानंतर उर्फीने स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मला ना कोणाची पत्नी व्हायचंच किंवा ना कोणाची आई व्हायचंय. स्त्री जेव्हा पत्नी किंवा आई बनते तेव्हाच ती पूर्ण होते या संकल्पनेवरच मला विश्वास नाही.”

पुढे उर्फी म्हणते, “चाहतजी, तू तर दोनदा बायको झालीस, तरी काय तीर मारलास? जोपर्यंत आई होण्याचा प्रश्न आहे, तो बायलॉजीचा विषय आहे. त्याशिवाय दत्तक घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. बरं, मी स्वत:ला बघेन, तुम्ही तुमचं बघा.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.