Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनवर कमेंट करणं उर्फीला पडलं महागात; नेटकरी म्हणाले “हीच खरी शेमडी”

त्याची फॅन फॉलोइंग पाहून अभिनेत्री उर्फी जावेदसुद्धा त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकली नाही. मात्र उर्फीने स्टॅनबद्दल असं काही म्हटलंय, जे ऐकल्यानंतर नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनवर कमेंट करणं उर्फीला पडलं महागात; नेटकरी म्हणाले हीच खरी शेमडी
एमसी स्टॅन, उर्फी जावेदImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 12:42 PM

मुंबई : बिग बॉस 16 चं विजेतेपद पटकावल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन घराघरात पोहोचला आहे. बिग बॉसच्या घरात असतानाही स्टॅनच्या लोकप्रियतेची प्रचिती प्रेक्षकांना आलीच होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेनं शाहरुख खान आणि विराट कोहली यांनाही मागे टाकलं आहे. स्टॅनच्या इन्स्टाग्राम लाइव्हला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. त्याची फॅन फॉलोइंग पाहून अभिनेत्री उर्फी जावेदसुद्धा त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकली नाही. मात्र उर्फीने स्टॅनबद्दल असं काही म्हटलंय, जे ऐकल्यानंतर नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

ट्रोल झाली उर्फी जावेद

शुक्रवारी उर्फीला तिची बहीण असफी जावेदसोबत पाहिलं गेलं होतं. त्यावेळी उर्फीला रॅपर एमसी स्टॅनच्या विजयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. स्टॅनने ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजेतेपद पटकावलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली उर्फी?

“एमसी स्टॅन तर मला खूप आवडतो यार, मी त्याच्यावर प्रेम करते. जेव्हा कधी मला कोणी विचारलं की कोण जिंकणार, मी नेहमीच त्याचं नाव घ्यायची. मला त्याची ‘शेमडी’सुद्धा खूप आवडते”, असं उर्फी म्हणाली. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन नेहमी अर्चना गौतमला ‘शेमडी’ म्हणून हाक मारायचा. तिचाच उल्लेख उर्फीने केला.

भविष्यात उर्फीला एमसी स्टॅनसोबत काम करायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “तुम्ही ही त्यालाच विचारा, कारण तो आता मोठा माणूस झालाय. मनाने तो फार चांगला आहे. त्याला सांगा की मी त्याच्यावर प्रेम करते. तो आता खूप मोठा स्टार बनलाय. मात्र तो खूप साफ मनाचा आहे.”

उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. “तो आधीपासूनच लोकप्रिय आहे, तू तुझा विचार कर”, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझ्यासारख्या लोकांनाच तो शेमडी म्हणतो’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. ‘खरी शेमडी अर्चना नाही तर तूच आहेस’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.