Urfi Javed: ‘..तोपर्यंत मी लग्न करणार नाही’; उर्फी जावेदने घेतला महत्त्वाचा निर्णय

या व्हिडीओच्या कॅप्शनने उर्फीच्या चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या कॅप्शनमध्ये उर्फीने तिच्या लग्नाचा (Marriage) उल्लेख केला आहे. इतकंच नव्हे तर लग्न करण्यासाठी तिने एक अटच घातली आहे.

Urfi Javed: '..तोपर्यंत मी लग्न करणार नाही'; उर्फी जावेदने घेतला महत्त्वाचा निर्णय
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 8:59 AM

आपल्या हटके आणि अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून (Bigg Boss OTT) बाहेर पडल्यानंतर उर्फीने नेहमीच तिच्या फॅशनमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. तोकडे कपडे परिधान करणारी उर्फी जेव्हा पंजाबी ड्रेसमध्ये दिसली, तेव्हा नेटकऱ्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या कॅप्शनने उर्फीच्या चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या कॅप्शनमध्ये उर्फीने तिच्या लग्नाचा (Marriage) उल्लेख केला आहे. इतकंच नव्हे तर लग्न करण्यासाठी तिने एक अटच घातली आहे.

उर्फीने इन्स्टाग्रामवर अली सेठीच्या ‘चांदनी रात’ या गाण्यावर रिल व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे गाणं तिला इतकं आवडलंय की जोपर्यंत तिच्या लग्नात हे गाणं वाजणार नाही, तोपर्यंत ती लग्न करणार नाही, असं तिने म्हटलंय. एका इफ्तार पार्टीतील हा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. ‘मी हा व्हिडीओ का अपलोड केलाय हे मला माहित नाही, पण मी या गाण्याच्या प्रेमात पडलेय. ज्यांनी आतापर्यंत अली सेठीचं ‘चांदनी रात’ हे गाणं ऐकलं नाही त्यांनी आधी ते गाणं ऐका आणि नंतर माझे आभार माना. त्याचप्रमाणे हे दृश्य अत्यंत दुर्लभ आहे. माझ्या लग्नात जोपर्यंत हे गाणं वाजणार नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही’, असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओमध्ये उर्फीने सलवार-कमीज परिधान केला असून डोक्यावरून दुपट्टा घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या या लूकवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. ‘ही उर्फी जावेद नाहीच’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधून प्रकाशझोतात आली. या शोमधून बाहेर पडणारी ती पहिलीच स्पर्धक होती. मात्र शोनंतर ती तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळेच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिली. सर्वांत हटके पोशाख आणि लूकमधील तिचे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. किंबहुना इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच ती असे कपडे परिधान करते, अशी टीका अनेकजण करतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.