Urfi Javed: वयाच्या 15 वर्षी उर्फी जावेदचा फोटो अडल्ट साइटवर झाला होता लीक अन्..

सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या उर्फीने (Urfi Javed) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. आरजे अनमोल आणि अमृता राव यांच्या शोमध्ये उर्फीने याबाबतचा खुलासा केला.

Urfi Javed: वयाच्या 15 वर्षी उर्फी जावेदचा फोटो अडल्ट साइटवर झाला होता लीक अन्..
urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 12:00 PM

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) या शोमधून प्रकाशझोतात आली. या शोमधून बाहेर पडणारी ती पहिलीच स्पर्धक होती. मात्र शोनंतर ती तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळेच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिली. सर्वांत हटके पोशाख आणि लूकमधील तिचे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. किंबहुना इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच ती असे कपडे परिधान करते, अशी टीका अनेकजण करतात. सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या उर्फीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. उर्फी 15 वर्षांची असताना तिचा फोटो अडल्ट वेबसाइटवर लीक झाला होता. आरजे अनमोल आणि अमृता राव यांच्या शोमध्ये उर्फीने याबाबतचा खुलासा केला.

ऑफ शोल्डर टॉप परिधान करून उर्फीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता आणि तोच फोटो कोणीतरी अडल्ट वेबसाटइवर लीक केला होता. “मी तेव्हा 15 वर्षांची होते आणि लखनऊमध्ये राहत होते. मी ऑफ शोल्डर टॉप परिधान केला होता. त्यावेळी तशा पद्धतीचे कपडे लखनऊमध्ये कोणी परिधान करत नव्हते आणि मिळतही नव्हते. मी घरीच तसा टॉप बनवला होता. तो टॉप परिधान करून मी माझा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि तोच फोटो कोणीतरी अडल्ट साईटवर अपलोड केला”, असं उर्फीने सांगितलं.

पहा व्हिडीओ-

“अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हेच मला त्यावेळी माहित नव्हतं. पण कठीण परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय तुम्ही तुमच्यातील क्षमतेला आणि धैर्याला ओळखू शकणार नाही. एकतर त्याविरोधात लढा किंवा त्याचा स्वीकार करा किंवा मग जीव द्या. मी त्याविरोधात लढण्याचं ठरवलं”, असं ती पुढे म्हणाली.

उर्फीने याआधी दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचाही खुलासा केला होता. उर्फीने ‘बेपनाह’, ‘बडे भैय्या की दुल्हनियाँ’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ती सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्समुळेच सर्वाधिक चर्चेत असते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.