‘चित्रा अशी कशी गं तू सास…’, उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं
चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या अटकेची मागणी केल्यानंतर मॉडेलचा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसीला सुरुच
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल ऊर्फी जावेद हिच्या अटकेची मागणी केल्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. चित्रा वाघ यांच्या आक्षेपांनंतर मॉडेलचा त्यांना डिवचण्याचा सिलसीला सुरुच झाला आहे. आता पुन्हा चित्राने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये पुन्हा मॉडेलने चित्रा वाघ यांना सासून म्हणून उल्लेख केला आहे. उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘उर्फी जावेदला दिला त्रास… चित्रा अशी कशी गं तू सास…’ सध्या उर्फीचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसीला सुरुच केला आहे.
Uorfi Javed la dila traas Chitra asi Kashi tu ga Saas
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023
याआधी देखील मॉडेलने चित्रा वाघ यांना सासू म्हणून डिवचलं आहे. ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. कधी चित्रा वाघ जी, कधी चित्रू, तर कधी सासू, असं म्हणत मॉडेल उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय. उर्फीच्या ट्विटमुळे चित्रा वाघ यांचा संताप अधिक वाढत आहे.
एवढंच नाही, तर उर्फीने चित्रा वाघ यांना एका ट्विटमध्ये आय लव्ह यू देखील म्हटलं आहे. ‘पण अद्यापही अधिक सुधारणं बाकी आहे.! सॉरी चित्रा वाघ जी! आय लव्ह यू…’ असं ट्विट उर्फीने केलं आहे. सध्या उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, उर्फीवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु झालेला वाद, त्या वादात सुप्रिया सुळेंनी मारलेली उडी यामुळं प्रकरण अधिकच चिघळलंय. त्यामुळे उर्फीच्या ट्विटला चित्रा वाघ कोणत्या प्रकारे उत्तर देतील, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.