urfi javed | ‘निर्माते, दिग्दर्शकांना नाही तर फक्त मुलींना…’, बॉलिवूडबद्दल उर्फी जावेद हिचं खळबळजनक वक्तव्य
'मुली फक्त दिग्दर्शक, निर्माते सांगतात तसं करतात तरी देखील टार्गेट मात्र...', उर्फी जावेद हिच्या कडून बॉलिवूडची दुसरी बाजू उघड... मॉडेलचं धक्कदायक वक्तव्य
मुंबई | मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या कपड्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. उर्फीची फॅशन काही लोकांना अवडते. तर काही जण मात्र उर्फीच्या फॅशनच्या विरोधात असतात. पण आता उर्फी तिच्या फॅशनमुळे नाही तर, एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे उर्फी चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये उर्फीने सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी जावेदच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे..
व्हिडीओमध्ये उर्फीने स्वतःच्या फॅशनबद्दल देखील मोठा खुलासा केला. मॉडेल म्हणाली, ‘मला आवडत माझ्या बॉडीला अशा प्रकारे प्रेजेन्ट करायला. माझी कला प्रेजेन्ट करायला आवडतं.. मला आवडत आहे, तर लोकांच्या भावना का दुखावत आहेत..’असं उर्फी म्हणाली.. शिवाय उर्फीने यावेळी दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर देखील निशाना साधला.. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडचं आणखी एक सत्य बाहेर आणलं आहे..
व्हिडीओमध्ये उर्फी पुढे म्हणते, ‘सिनेमात आयटन सॉन्ग्स असतात, लिरिक्स कसे असतात, डान्स.. इत्यादी गोष्टी असतात. तरी देखील कोणीही दिग्दर्शक, निर्मात्यांना टार्गेट करत नाही. मुलीकडून हे काय करुन घेतलं.. अशात देखील फक्त मुलींना बोलतात. हिने काय कपडे घातलं आहे, कशी डान्स करत आहे…. ती तर फक्त दिग्दर्शक, निर्माते सांगतात तसं करत आहे. कोणीच दिग्दर्शक, निर्मात्यांना बोलत नाही. कायम फक्त मुलींना गोष्टी ऐकाव्या लागतात.’ असं देखील उर्फी म्हणाली..
View this post on Instagram
एका superboy_luxury या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन उर्फी जावेद हिचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिवाय अनेकांनी उर्फीच्या वक्तव्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कायम आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी आता मोठ-मोठ्या ब्रॅन्डसोबत काम करत आहे. नुकताच उर्फीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासोबत फोटोशूट केलं.
‘बिग बॉस ओटीटी’मुळे उर्फी तुफान चर्चेत आली. पण बिग बॉसमधून देखील तिला लोकप्रियता मिळाली नाही. अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये उर्फी झळकली. पण तेव्हा देखील तिला अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर उर्फी तिच्या कपड्यामुळे चर्चेत आली. अखेर उर्फीचे कपडे आणि तिची फॅशन चर्चेत राहिली. सोशल मीडियावर कायम उर्फीच्या फॅशनची चर्चा रंगत असते.