Urfi Javed: अचानक तब्येत बिघडल्याने उर्फी जावेदला रुग्णालयात केलं दाखल; फोटो पोस्ट करत म्हणाली..

उर्फीने हॉस्पिटलमधील स्वत:चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे आणि तिच्यासमोर जेवण ठेवलेलं आहे.

Urfi Javed: अचानक तब्येत बिघडल्याने उर्फी जावेदला रुग्णालयात केलं दाखल; फोटो पोस्ट करत म्हणाली..
Urfi Javed: अचानक तब्येत बिघडल्याने उर्फी जावेदला रुग्णालयात केलं दाखल
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 10:15 AM

आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) अनेकांना माहित असेल. अनेकदा तिला तिच्या या फॅशन सेन्समुळे (Fashion) टीकेलाही सामोरं जावं लागतं. मात्र ट्रोलर्सना न जुमानता उर्फी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. सध्या उर्फी सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्फीची प्रकृती ठीक नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. उर्फीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून उलट्या होत होत्या आणि शनिवारी तापही आला. त्यामुळे तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन (Kokilaben Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उर्फीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्याच्या अहवालानंतरच नेमकं काय झालं ते स्पष्ट होईल.

उर्फीने हॉस्पिटलमधील स्वत:चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे आणि तिच्यासमोर जेवण ठेवलेलं आहे. हॉस्पीटलचं जेवण आवडत नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव या फोटोत पहायला मिळत आहे. ती तिच्या तब्येतीची योग्य काळजी घेत नसल्याने असं घडल्याचं तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचं तिने म्हटलंय.

उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल जरी होत असली तरी यापूर्वी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं. आपल्या फॅशन सेन्सविषयी बोलताना उर्फी एका मुलाखतीत म्हणाली होती, “प्रत्येकाला विविध फॅशनचे कपडे घालणं, मेकअप करणं आणि सर्वोत्कृष्ट दिसणं आवडतं. मी जे काही करते, ते मी माझ्यासाठी करते. कारण चांगलं दिसणं कोणाला आवडत नाही? जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे.”

ड्रेसिंग सेन्सवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया

तिच्या फॅशनबद्दल घरच्यांची काय प्रतिक्रिया असते असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “ते काही बोलत नाहीत. मी लहान नाही आणि मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते. मी माझ्या पालकांचा आदर करते आणि त्यांच्यावर प्रेमसुद्धा करते, पण मला माझ्यासाठी जे योग्य वाटतं ते मी करते.”