हिने तर लाजच सोडली, डोळे बंद करा, उर्फी जावेद हिच्या ‘त्या’ फोटोवर नेटकरी प्रचंड भडकले

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. बिकिनीतील या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हिने तर लाजच सोडली, डोळे बंद करा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

हिने तर लाजच सोडली, डोळे बंद करा, उर्फी जावेद हिच्या 'त्या' फोटोवर नेटकरी प्रचंड भडकले
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 11:58 AM

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री उर्फी जावेद म्हटलं की सर्वांत आधी डोळ्यांसमोर तिचे चित्रविचित्र कपडे आणि फॅशनच येतं. उर्फी आणि अजबगजब फॅशन हे जणू समीकरणच बनलं आहे. म्हणूनच तिला साध्या कपड्यांमध्ये पाहिलं की नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल केलं गेलंय. पण कुठल्याही ट्रोलिंगला न जुमानता उर्फी अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करताना दिसते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. बिकिनी लूकमधील उर्फीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फीने इन्स्टाग्रामवर ‘मिरर सेल्फी’ पोस्ट केला आहे. यामध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पहायला मिळतेय.

काही दिवसांपूर्वीच उर्फीला तिच्या एका लूकमुळे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. हॅलोवीनच्या निमित्ताने तिने बॉलिवूड चित्रपटातील एका भूमिकेसारखा वेश केला होता. ही भूमिका होती ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील छोटा पंडितची. अभिनेता राजपाल यादवने ही भूमिका साकारली होती. तसाच लूक उर्फीने केला होता. मात्र छोटा पंडितसारखा लूक करणं तिला चांगलंच महागात पडलं होतं. यामुळे उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी फक्त तिच्या कपड्यांमुळे किंवा चित्रविचित्र फॅशन सेन्समुळेच चर्चेत राहत नाही. तर अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. उर्फी कधी कोणते कपडे परिधान करेल याचा नेम नाही. त्याचप्रमाणे ती कधी काय बोलणार, याचाही नेम नसतो. “मी विवस्त्रच राहते. मी इतकं महागडं 3 बीएचके घर विकत घेतलं आहे. आधी एकाच घरात खूप लोक राहायचे. मात्र आता मी स्वत:चं मोठं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे माझ्या घरी मी विवस्त्रच राहते. मला तसं राहायला आवडतं”, असं ती एका मुलाखती म्हणाली होती. उर्फीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘ही संपूर्ण पिढी बर्बाद करू शकते’, असं एकाने म्हटलं होतं. तर ‘या देशाचं काय होईल’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.