कश्मिरी फेरन घालून Urmila Matondkar झाल्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी
'जब साथ आ जाते हैं सितारे, कुछ और दमक उठती है यात्रा!', उर्मिला मातोंडकर यांचा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग, फोटो व्हायरल
Urmila Matondkar Joined Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या त्यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये आता पर्यंत अनेक कलाकार आणि राजकीय व्यक्ती सहभागी झाल्या. आता भारत जोडो यात्रेमध्ये अभिनेत्री आणि नेत्या उर्मिला मातोंडकर देखील सहभागी झाल्या. काँग्रस नेते राहुल गांधी याच्या नेतृत्वामध्ये भारत जोडो यात्रेची सुरुवात जम्मू येथील नगरोटा शहरातून झाली. तर उर्मिला मातोंडकर राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी यात्रेत सहभागी झाल्या.
उर्मिला मातोंडकर यांचे अनेक फोटो काँग्रेस पार्टीने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी आणि उर्मिला मातोंडकर यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘जब साथ आ जाते हैं सितारे, कुछ और दमक उठती है यात्रा!’ असं लिहिलं आहे. सध्या उर्मिला मातोंडकर यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
जब साथ आ जाते हैं सितारे कुछ और दमक उठती है यात्रा!
मशहूर अभिनेत्री @UrmilaMatondkar ने यात्रा में शामिल हो कर दीं अपनी शुभकामनाएं।#BharatJodoYatra pic.twitter.com/ztswuawVNX
— Bharat Jodo (@bharatjodo) January 24, 2023
भारत जोडो यात्रेमध्ये उर्मिला मातोंडकर यांनी कश्मिरी क्रिम रंगाचा पारंपरिक ड्रेस कश्मिरी फेरन आणि टोपी घातली होता. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या, ‘थंडीमध्ये तुमच्यासोबत बोलत आहे. थोड्यावेळात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.’ सध्या त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Jammu “Bharat Jodo Yatra”#love #Peace #Equality #BharatJodoYatraInJK #BharatJodoYatra #JaiHind pic.twitter.com/awzc67uL9O
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 24, 2023
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाले. एवढंच नाही, तर अनेक कलाकार देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्राने जगभरात आपली छाप सोडली आहे. ७ सप्टेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा ३० जानेवारी २०२३ पर्यंत सुरु असणार आहे. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्राची सांगता जम्मू-काश्मिर येथील श्रीनगर याठिकाणी होणार आहे. यावेळी राहूल गांधी राष्ट्रीय ध्वज फडकावत यात्रा समाप्त करणार आहेत.