Urvashi Rautela: उर्वशी मंचावर उभी राहताच ऋषभ पंतच्या नावाची घोषणाबाजी; पहा पुढे काय घडलं..

उपस्थितांमधून ऋषभ पंतची घोषणा होत असतानाच उर्वशीने केलं असं काही, जे पाहून चिरंजीवी झाले थक्क!

Urvashi Rautela: उर्वशी मंचावर उभी राहताच ऋषभ पंतच्या नावाची घोषणाबाजी; पहा पुढे काय घडलं..
Chiranjeevi and Urvashi RautelaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 3:04 PM

विशाखापट्टणम: अभिनेत्री उर्वशी रौतेला ज्याठिकाणी असेल तिथे क्रिकेटर ऋषभ पंतचा उल्लेख झाला नाही.. असं होतंच नाही. उर्वशीने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. विशाखापट्टणममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला मेगास्टार चिरंजीवीसुद्धा उपस्थित होते. यावेळी उर्वशीला मंचावर बोलवण्यात आलं होतं. उर्वशी मंचावर पोहोचताच चाहत्यांनी क्रिकेटर ऋषभ पंतच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली. त्यावर उर्वशीने काय प्रतिक्रिया दिली, याचा व्हिडीओ समोर आला आहे.

उर्वशी लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. जेव्हा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने उर्वशीला मंचावर बोलावलं. तेव्हा उपस्थितांनी ऋषभ पंतच्या नावाची घोषणा केली. असं काही घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही उर्वशीसमोर चाहत्यांनी ऋषभच्या नावाचा उल्लेख केला.

हे सुद्धा वाचा

सुरुवातीला उर्वशीने उपस्थितांना अभिवादन केलं. त्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. काही सेकंद थांबल्यानंतर उर्वशीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं भाषण सुरू केलं. यावेळी उर्वशीचा संयम पाहून मेगास्टार चिरंजीवीसुद्धा प्रभावित झाले.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावरही ऋषभच्या घोषणाबाजीवरून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. याच रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू आहेत.

उर्वशीच नाही तर तिची आई मीरा रौतेलासुद्धा चर्चेत आहे. उर्वशीनंतर मीरा यांनीसुद्धा ऋषभ पंतसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांनीसुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये कोकिलाबेन रुग्णालयाचा फोटो पोस्ट केला होता. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी अशी पोस्ट केली, असा आरोप ऋषभच्या चाहत्यांकडून झाला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.