ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारताच भडकली उर्वशी रौतेला; रागाच्या भरात पत्रकाराला म्हणाली..
क्रिकेटर ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या डेटिंगच्या चर्चा काही नव्या नाहीत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा पत्रकाराने उर्वशीला ऋषभबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तिचा पारा चांगलाच चढला होता.
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या कामापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशीचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलंय, ही बाब जगजाहीर आहे. या दोघांमधील लव्ह-हेट रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी नेटकरी त्याची लिंक ऋषभ पंतशी जोडण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नव्हे तर कार्यक्रमांमध्येही उर्वशीसमोर चाहते ऋषभच्या नावाचा जयघोष करत असतात. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यावर उर्वशीने नेहमीच प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला ऋषभविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर अखेर अभिनेत्रीचा पारा चढला.
सोशल मीडियावर सध्या उर्वशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट पहायला मिळतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला पत्रकार तिला क्रिकेटर ऋषभ पंतविषयी प्रश्न विचारतो. मात्र यावेळी त्या प्रश्नावर उर्वशीची अशी प्रतिक्रिया समोर येते, ज्याचा नेटकऱ्यांनी क्वचितच विचार केला असेल.
काय म्हणाली उर्वशी?
नेहमीच विचार करून उत्तरं देणारी उर्वशी यावेळी पत्रकारावर चांगलीच भडकली होती. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतं की पत्रकार उर्वशीसोबत ऋषभ पंतबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र उर्वशी त्याच्यावर भडकून म्हणते, “तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय हवंय ते सांगा. तुम्हाला फक्त आणि फक्त टीआरपी हवा असतो, पण ते मी देणार नाही.”
View this post on Instagram
उर्वशीच्या या व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आधी स्वत:च अफेअरच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर शंका उपस्थित करणारे पोस्ट शेअर केले आणि आता स्वत:च भडकतेय, असं एकाने म्हटलं. तर ‘सर्वांना ओरडून ओरडून सांगणारी हीच होती’, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय.
उर्वशी-ऋषभचा नेमका वाद काय?
उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.
ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. त्याच रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू होते.