सासू-सुनेचा डान्स पाहून उषा नाडकर्णींना आली ‘पवित्रा रिश्ता’ची आठवण

जेव्हा उषा नाडकर्णी यांनाही आवरत नाही डान्सचा मोह..

सासू-सुनेचा डान्स पाहून उषा नाडकर्णींना आली 'पवित्रा रिश्ता'ची आठवण
जेव्हा उषा नाडकर्णी यांनाही आवरत नाही डान्सचा मोह..Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 7:48 PM

मुंबई- झी वाहिनीवरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अनेकांना माहीत असेल. यामध्ये अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मालिकेत सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. या मालिकेतील उषा यांची भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ‘डीआयडी सुपरमॉम्स’ या डान्स शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. या शोच्या सेटवर सासू-सुनेचा डान्स पाहिल्यानंतर उषा यांना ‘पवित्र रिश्ता’ची आठवण झाली.

‘डीआयडी सुपरमॉम्स’ या शोमध्ये सासू-सुनेची जोडी जबरदस्त डान्स सादर करते. तो डान्स पाहिल्यानंतर सर्वचजण त्यांचं कौतुक करतात. या एपिसोडमध्ये उषा नाडकर्णी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. स्पर्धकांचा डान्स पाहिल्यानंतर त्या आनंदाने म्हणतात, “सासूचा डान्स पाहिल्यानंतर मला ‘पवित्र रिश्ता’ची आठवण आली. मीसुद्धा असं नाचायचे.” यावेळी उषा नाडकर्णी त्यांच्या डान्सची एक झलकसुद्धा दाखवतात. याच व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

उषा यांनी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही खूप काम केलं. 1999 मध्ये उषा यांनी मालिका विश्वात प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मालिका असल्याचं सिद्ध झालं. जिथे त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत त्यांनी सविता देशमुख ही भूमिका साकारली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांनी म्हटलं होतं की, “माझा माणूस (सुशांत सिंह राजपूत) माझ्या हृदयात कायम राहील, त्याला कोणीही माझ्या हृदयातून बाहेर काढू शकत नाही.”

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.