Sarthak Shinde | शिंदे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला गायकीचा वारसा पुढे आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी जपला. त्यानंतर उत्कर्ष, मधुर आणि आदर्श शिंदे हे आताच्या पिढीत लोकप्रिय ठरत आहेत.

Sarthak Shinde | शिंदे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन
शिंदेशाहीतला एक तारा निखळलाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 1:08 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद शिंदे यांचा पुतण्या आणि प्रल्हाद शिंदे यांचा नातू सार्थक शिंदेचं निधन झालं आहे. 31 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. उत्कर्ष शिंदेनं इन्स्टा स्टोरीमध्ये सार्थकसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. सार्थकसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. तुझी कायम आठवण येईल.’ सार्थक हा दिनकर शिंदेंचा मुलगा होता. तबला आणि ढोलकीवादक म्हणून त्याची ख्याती होती. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे कार्यक्रम व्हायचे.

ढोलकीवादनासह सार्थक भीमगीतांसाठी प्रसिद्ध होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याने नांदेडमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचं कळतंय. प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला गायकीचा वारसा पुढे आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी जपला. त्यानंतर उत्कर्ष, मधुर आणि आदर्श शिंदे हे आताच्या पिढीत लोकप्रिय ठरत आहेत. सार्थकसारख्या तरुण गायकाने अशी अचानक घेतलेली एग्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. शिंदेशाहीतील एक तारा निखळला, अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

संगीत हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शिंदे घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. या घराण्याने पारंपरिक गाणी, कव्वाली, भारूड, गोंधळ, प्रेम गीतं गाऊन रसिकांची मनं जिंकली. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी फार दुर्मिळ असतात, ज्यांना पाच पिढ्यांचा वारसा लाभतो.

भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.