अंकिता लोखंडेला सासूने सुनावल्यानंतर अखेर विकीने सोडलं मौन; म्हणाला “त्यांनी जे शब्द वापरले ते..”

विकीची आई आणि अंकिताची सासू रंजना जैन या जेव्हा बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा गेल्या, तेव्हापासून त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. विविध कारणांमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं गेलं. आता विकीने त्यावर मौन सोडलं आहे. आईच्या वक्तव्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता लोखंडेला सासूने सुनावल्यानंतर अखेर विकीने सोडलं मौन; म्हणाला त्यांनी जे शब्द वापरले ते..
अंकिता लोखंडे-विकी जैन आणि रंजना जैनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 11:44 AM

मुंबई : 3 फेब्रुवारी 2024 | छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ नुकताच संपला आहे. या शोचा प्रत्येक सिझन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यंदाच्या सिझनमध्ये फॅमिली राऊंडमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेची सासू म्हणजेच विकी जैनची आई बिग बॉसच्या घरात आली होती. यावेळी त्या सून अंकिताबद्दल बरंच काही बोलून गेल्या. ज्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली. आता बिग बॉस संपल्यानंतर आईच्या वागणुकीवर विकीने प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या एक आठवड्याआधी विकी घरातून बाहेर निघाला. त्यानंतर त्याने बिग बॉसमधील मैत्रिणींसोबत जोरदार पार्टी केली होती. त्यामुळेही अंकिता आणि विकीची जोडी चर्चेत आली होती. आता विकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आईच्या वागणुकीबद्दल बोलताना दिसतोय. आईने जे शब्द वापरले होते, ते चुकीचेच होते, असं त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला विकी?

“एका आईच्या तिच्या मुलासाठी ज्या भावना होत्या, त्या ठीक असू शकतात. पण त्यांनी वापरलेले शब्द अजिबात ठीक नव्हते. काही गोष्टी त्यांनी बोलायला पाहिजे नव्हत्या. कदाचित हे सर्व त्या क्षणांपुरतंच मर्यादित होतं, कारण बऱ्याच गोष्टी बिग बॉसच्या घरात घडत होत्या. त्यामुळे तेव्हा त्यांनी पटकन तशी प्रतिक्रिया दिली, जी योग्य नव्हती. पण मी आता एवढंच बोलू इच्छितो की जे झालं ते झालं. आता आम्ही ज्याप्रकारे सोबत आहोत ते सर्वांत जास्त महत्त्वाचं आहे. आता आम्ही सर्वजम खूप खुश आहोत. आम्ही आताच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यामुळे सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकी सर्व गोष्टी आता ठीक आहेत,” असं त्याने स्पष्ट केलंय.

अंकिताने ऑक्टोबर महिन्यात पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत विविध कारणांवरून वाद होताना दिसले. पतीसोबतचे वाद असतानाच अंकिताची सासू म्हणजेच विकीची आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये केली होती. अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली. मात्र चौथ्या स्थानी पोहोचल्यानंतर तिचा प्रवास संपला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.